Nawab Malik : 'नवाब मलिक आमचे'; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची चढाओढ

संख्याबळ वाढवण्यासाठी दोन्ही गटांची तयारी


मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची दीड वर्षांनंतर अखेर जामीनावर सुटका झाली आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २ महिन्यांसाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यांची सुटका होताच ते शरद पवार (Sharad Pawar) गटात जाणार की अजित पवारांना (Ajit Pawar) पाठिंबा देणार यावर चर्चा सुरु झाल्या. यानंतर आता दोन्ही गटही त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.


नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे (NCP) वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे ते ज्या गटाला पाठिंबा देतील त्या गटाला फायदाच होणार आहे. त्यासाठी दोन्ही गट सज्ज आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी आज नवाब मलिक यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तर त्यांच्या सुटकेआधीच सुप्रिया सुळे (Supriya Sule) स्वत: त्यांना भेटण्याची प्रतीक्षा करताना दिसल्या होत्या. अजित पवार गटाच्या भेटीवेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आणि मुंबई विभागीय समन्वय समिती सदस्य संतोष धुवाळी हे देखील उपस्थित होते.


याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नवाब मलिक हे अजित पवार यांनाच पाठिंबा देणार असल्याचे म्हणाले होते. सरळ सरळ त्यांनी तसा दावाच केला होता. तर नवाब मलिक हे शरद पवारांचे सच्चे कार्यकर्ते असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. त्यामुळे आता नवाब मलिक काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने