Wagner group : खिचडी कशी चोरली यावर बैठकीत चर्चा करा!

जी अवस्था वॅगनर ग्रुपची झाली, तीच विरोधकांची होणार!


विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजप आमदार नितेश राणे यांचा टोला


मुंबई : भाजपविरोधात (BJP) विरोधी पक्षांनी (Opposition Parties) एकत्र येत आघाडी स्थापन केली तेव्हा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही आघाडी म्हणजे 'वॅगनर ग्रुप' (Wagner group) असल्याचे म्हटले होते. मात्र कालच मिळालेल्या वृत्तानुसार वॅगनर ग्रुपच्या प्रमुखांचं विमान क्रॅश झालं. याच गोष्टीचा आधार घेत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. जी वॅगनर ग्रुपची अवस्था झाली आहे तीच या विरोधकांचीही होईल, असा टोला त्यांनी यावेळेस लगावला.


नितेश राणे म्हणाले, आपल्याला आठवत असेल वॅगनर ग्रुपबद्दल तेव्हा संजय राऊतने फार बोंबोबोंब केली, अग्रलेख लिहिला की भारतातला विरोधी पक्ष हा वॅगनर ग्रुप आहे. पण काल मिळालेल्या माहितीनुसार वॅगनर ग्रुपच्या प्रमुखांचं विमान क्रॅश झालेलं आहे, मग आता हे सगळे विरोधी पक्ष ज्या एका विमानात बसले आहेत त्यांचं विमान देखील २०२४ ला क्रॅश होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कितीही बैठका घ्या आणि कितीही त्या ग्रुपला 'I.N.D.I.A' म्हणा, जी वॅगनर ग्रुपची अवस्था झाली आहे तीच या विरोधकांचीही होईल, हे मी विश्वासाने सांगू शकतो, असं नितेश राणे म्हणाले.


मुंबईत होणार्‍या बैठकींबद्दल हा 'खिचडीचोर' मोठ्या बाता करतो की पत्रकार परिषद होणार, मोठमोठे नेते येणार. मग त्या मुंबईच्या बैठकीत तू आणि तुझ्या मालकाच्या मुलाने कामगारांची जी खिचडी चोरलेली आहे ती विरोधी पक्षांच्या सगळ्या नेत्यांना खायला घाला. तुम्हाला जमत नसेल तर आम्ही आमच्या वतीने या बैठकीसाठी खिचडीचे पॅकेट पाठवू. जेणेकरुन सगळे एकत्र बसा आणि खिचडी कशी चोरली यावर बैठकीत चर्चा करा आणि जे वॅगनर ग्रुपचं झालं तेच आपलं होणार यावर डोकं पकडून रडत बसा, अशा खोचक शब्दांत नितेश राणे यांनी टीका केली आहे.



संजय राऊतला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या योगदानाची जाण नाही


कोण आहेत हे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) विचारणाऱ्या संजय राजाराम राऊत सारख्या खिचडी चोर, पत्रा चाळीतील मराठी लोकांची घरे लुटणारा चोर, कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार करणार्‍या संजय राऊतला चंद्रशेखर बावनकुळे यांचे महाराष्ट्रासाठी, भाजपा साठी काय योगदान आहे याची ओळख असू शकत नाही, असंही नितेश राणे म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने