Mega Block : मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नाही


मुंबई : रुळ, ओव्हरहेड वायर, सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार ३ सप्टेंबर रोजी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. मेगा ब्लॉकच्या कालावधीत काही लोकल उशीराने धावणार असून काही लोकल रद्द करण्यात येतील, असे मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक नसल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.


मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील लोकल माटुंगा - मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर ठाणे स्थानकातून अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड - माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.


हार्बर मार्गावर मानखुर्द-नेरुळ अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून पनवेल, बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल आणि बेलापूर स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.


ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - मानखुर्द या मार्गावर विशेष उपनगरीय लोकल चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी, नेरुळ स्थानकावरील ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि मेन लाईन सेवा सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत उपलब्ध असतील.


दरम्यान येत्या रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी