Aditya L-1 Mission : मानवजातीच्या कल्याणासाठी आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटद्वारे दिल्या शुभेच्छा


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही केले कौतुक


नवी दिल्ली : भारताने आपली महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिम (Chandrayaan Mission) अत्यंत यशस्वीरित्या पार पाडली. हा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवावा असाच क्षण आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीदेखील इस्रोच्या (ISRO) मुख्यालयात जाऊन शास्त्रज्ञांच्या चमूचे अभिनंदन केले. यानंतर काहीच दिवसांत भारताने आपली पहिलीवहिली सौरमोहिम हाती घेतली. आज या मोहिमेतील आदित्य एल-१ चे (Aditya L-1) यशस्वी उड्डाण झाले असून त्यानिमित्त भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांचं यश' असं ट्विट करत पुन्हा एकदा भारतीय शास्त्रज्ञांची पाठ थोपटली आहे.


पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, चांद्रयान-३ च्या यशानंतर भारताचा अवकाश प्रवास सुरूच आहे, भारताच्या आदित्य एल-१ या पहिल्या सौर मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोच्या आमच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी विश्वाची चांगली समज विकसित करण्यासाठी आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील, असं मोदीजी म्हणाले आहेत.





अमित शाह यांनीही केले कौतुक


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या एक्स अकाऊंटद्वारे आदित्य एल-१ च्या प्रक्षेपणाचा व्हिडीओ शेअर करत भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, आपल्या शास्त्रज्ञांनी वेळोवेळी आपले सामर्थ्य आणि तेज सिद्ध केले आहे. भारताचे पहिले सौर मिशन आदित्य एल-१चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल देशाला अभिमान आणि आनंद आहे. या अतुलनीय कामगिरीसाठी इस्रो संघाचे अभिनंदन. अमृत महोत्सवादरम्यान अंतराळ क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताची पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने ही एक मोठी वाटचाल आहे, असं अमित शाह म्हणाले.





Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा