Nitesh Rane : स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या घमंडियांमध्ये स्टॅलिनच्या कार्ट्याविरुद्ध बोलण्याची हिंमत आहे का?

नितेश राणे यांचा सवाल


मुंबई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M. K. Stalin) यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. त्यांनी सनातन धर्मांची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. त्यांच्या वक्तव्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. मात्र ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीदेखील जोरदार शब्दांत विरोधकांच्या आघाडीला सुनावले आहे. स्वतःला हिंदू म्हणवून घेता मग स्टॅलिनविरुद्ध बोलून दाखवा, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे.


नितेश राणे म्हणाले, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिनच्या कार्ट्याने सनातन हिंदू धर्म संपवून टाकू, असं बोलण्याची हिंमत दाखवली. या कार्ट्याला हे माहित नाही की जे ब्रिटिशांना जमलं नाही, जे औरंग्या आणि मुघलांना जमलं नाही ते तुला आणि घमंडियाच्या नावाने जमलेल्या सर्व पक्षांपैकी कोणालाही जमणार नाही. तो कार्टा हे विसरला की आमचे सगळे पूर्वज हे हिंदू होते. जो स्वतःच्या धर्माचा झाला नाही तो देशाचा आणि राज्याचा काय होणार? आणि स्वतःला 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मी मुलगा आहे' असं जे बोलत फिरतात ते उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackeray)  हे सनातनी हिंदू धर्मावर जे आक्रमण होत आहे त्यावर बोलण्याची हिंमत दाखवणार का? का चिडीचुप बसला आहात? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.


पुढे उद्धव ठाकरेंना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही हिंदू आहात ना? हिंदुत्वाचं सर्टिफिकेट सगळ्यांना देत फिरता मग स्टॅलिनच्या कार्ट्याविरोधात बोलण्याची हिंमत दाखवा. काही दिवसांअगोदर ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये स्टॅलिनची सेवा करत होता ना? खायला घालत होता, पाय दाबत होता! त्यामुळे तो सनातनी हिंदू धर्माचा अशा प्रकारे अपमान करत असेल तर त्याच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या या सगळ्या विरोधी पक्षांमध्ये आहे का? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.



संजय राऊत (Sanjay Raut) यांना उद्देशून नितेश राणे म्हणाले की, तुझ्यामध्ये हिंमत असेल तर उद्याचा अग्रलेख स्टॅलिनच्या कार्ट्यावर लिही, उद्याचा अग्रलेख सनातन हिंदू धर्माच्या समर्थनार्थ लिही. हिंदुत्वाचं मुखपत्र म्हणून चालवता ना? मग त्या स्टॅलिनच्या कार्ट्याला विरोध करण्याची हिंमत दाखवा आणि सनातन हिंदू धर्माचं समर्थन करण्याची हिंमत दाखवा, असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन