Lalbaugcha raja : आला आला आला माझा गणराज आला...

गणरायाच्या आगमनासाठी लालबाग सज्ज!


पाहा लालबागच्या लगबगीची एक खास झलक...


मुंबई : गणपतीच्या आगमनाला (Ganeshotsav) अवघे दोन आठवडे राहिले आहेत. मुंबईतल्या अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये तर गणरायाचे आगमनदेखील झाले आहे. आता ओढ आहे ती गणेशचतुर्थीची. त्यातच गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी गर्दीने गजबजून जाणारं लालबाग यंदाही भाविकांना खुणावत आहे. गणपतीसाठी सजावटीच्या वस्तू, प्रसाद, आरतीचं सामान, पूजेचं सामान अशा सगळ्याच गोष्टींनी लालबागसह दादर (Dadar) परिसर फुलला आहे.


लालबागचा राजा (Lalbaugcha raja) म्हणजे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. दरवर्षी लाखो भक्त केवळ राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. याच राजाचा मंडपदेखील सजवून झाला आहे. बाहेरच्या बाजूला आकर्षक अशी कमान तयार करण्यात आली असून त्यावर सुबक अक्षरात 'लालबागचा राजा' असं लिहिलं आहे.



अशी चिकमोत्यांची माळ...


प्रत्येकाला आपल्या घरात येणारा बाप्पा वेगळा दिसावा असं वाटत असतं. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या सोन्याच्या, मोत्यांच्या दागिन्यांनी मढवण्यात येतं. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी या आभूषणांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. स्वस्त दरात ही खरेदी करण्यासाठी अगदी लांबून लोक लालबागच्या बाजारपेठेत येतात. यंदाही बाप्पाला सजवण्यासाठी फुलांचे हार, मोत्यांच्या माळा यांसारख्या विविध आभूषणांनी बाजारपेठा सज्ज आहेत. बाप्पाच्या भजनासाठी टाळ, मृदुंग यांसारखी वाद्येही दुकानांत सजवून ठेवण्यात आली आहेत.



एक तरी मोदक खा ना गणुल्या रे...


बाप्पाला नैवेद्यात सगळ्यात जास्त आवडणारा मोदकही प्रचंड प्रमाणात विक्रीसाठी सज्ज आहे. मोठ्या आकारात मिळणारा प्रसादासाठी विशेष प्रसिद्ध कडक बुंदीचा मोदकही उपलब्ध आहे. बाप्पाला नैवेद्य म्हणून देण्यात येणारे २१ काजूंचे मोदक, मिठाई, लाडू या सगळ्यांची रेलचेल आहे.



गौराई आली अंगणी...


गौरी-गणपती म्हणजे बायकांसाठी पर्वणीच. गौरीचं घरात आगमन झालं की बायकांना अत्यानंद होतो. तिला सजवणं, साडी नेसवणं, दागिन्यांनी मढवणं, नैवेद्याची तयारी करणं या सगळ्या गोष्टी त्या अगदी मन लावून करतात. लालबागच्या कार्यशाळांमध्ये या गौरीही सुंदर रितीने सजवून ठेवण्यात आल्या आहेत.


लालबागमधील या सगळ्या लगबगीची काही खास दृश्ये टिपली आहेत आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी...



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने