Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच आठपदरी होणार

रस्ते विकास महामंडळाने सादर केला प्रस्ताव


मुंबई : राज्यात वाहतूक कोंडीची (Traffic jam) समस्या गंभीर बनत चालली आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने कोणत्याही वेळी एक्स्प्रेस वेजवर वाहनांची गर्दी पाहायला मिळते. पण यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढले असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. म्हणूनच रस्ते विकास महामंडळाने एक नवा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे (Mumbai Pune Expressway) लवकरच आठपदरी करण्याचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळानं (Maharashtra State Road Development Corporation) राज्य सरकारला (Maharashtra State Government) दिला आहे.


पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणार्‍यांची संख्या खूप जास्त आहे. शिवाय लोणावळा आणि पुण्यातील इतर पर्यटनस्थळे पाहण्यासाठी येणारे पर्यटक देखील याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे आठवडाअखेरीस आणि सुट्टीच्या दिवशी या महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे सध्या सहापदरी असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे दोन मार्गिका वाढवून आठपदरी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारने हा प्रस्ताव मान्य केल्यानंतर पुढील तीन वर्षांत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचा रस्ते विकास महामंडळाचा मानस आहे.


मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आठपदरी झाल्यास बाहतूक कोंडी कमी होऊ शकेल आणि अपघातांचे प्रमाणही टळू शकेल, अशी आशा आहे. सरकारने महामंडळाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास वर्षभरात कामाला सुरुवात होऊ शकेल व पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण केले जाईल. एकीकडे, वेगाने काम सुरू असलेला मिसिंग लिंक प्रकल्प आणि दुसरीकडे आठ लेन करण्याचा प्रस्ताव, यामुळे मुंबईहून (Mumbai News) पुण्याकडे (Pune) जाणाऱ्यांसह सातारा, कोल्हापूर, कोकण आणि गोव्यात जाणाऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.