BJP Express by Nilesh Rane : गणपती बाप्पा मोरया! विशेष 'भाजप एक्स्प्रेस'ने चाकरमानी कोकणात रवाना...

निलेश राणे यांनी केले आयोजन


मुंबई : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोकणात जायला आतुर झालेल्या चाकरमान्यांना खुश करण्यासाठी राणे कुटुंबीय नेहमीच सजग असतात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चाकरमान्यांना मोफत गावी जाता यावे यासाठी माजी खासदार निलेश नारायण राणे (Nilesh Narayan Rane) यांनी पुढाकार घेतला. दादर ते कुडाळ (Dadar to Kudal) अशा मोफत 'भाजप एक्स्प्रेस'चे (BJP Express) निलेश राणे यांनी आयोजन केले. याला कोकणवासियांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.


कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या चाकरमान्यांनी आज दादर स्टेशन फुलून गेलं होतं. सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी जमा झाली होती. ज्यांनी या सेवेसाठी अर्ज केला होता त्या कोणाचेही नुकसान होऊ नये याची यावेळेस खबरदारी घेण्यात आली. माजी खासदार निलेश राणे यांनी हातात भाजपचा झेंडा घेऊन तो फडकावला आणि दुपारी १२ वाजता वेळेत ही ट्रेन सोडण्यात आली. यावेळेस रेल्वेने गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता.


निलेश राणे यांनी हात हलवत सर्वांना निरोप दिला आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. सर्व कोकणवासीयांचे चेहरे आनंदाने खुलले होते. ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्वांनी निलेश राणे यांचे आभार मानले. आजची ही दादरची दृश्ये आणि 'भाजप एक्स्प्रेस' सुटतानाचे खास क्षण टिपले आहेत आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी...



दरम्यान, उद्या देखील दुपारी १२:३० वाजता आमदार नितेश राणे यांच्यातर्फे 'मोदी एक्स्प्रेस' सोडण्यात येणार आहे. ही एक्स्प्रेस फलाट क्रमांक ८ वरुन सुटणार आहे. शिवाय यामध्ये प्रवाशी गणेशभक्तांना जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर