Navratri 2023 : दुर्गे दुर्गट भारी तुजविण संसारी... आता सर्वत्र नवरात्रीचा जल्लोष!

नवरात्रीसाठी देवीच्या मूर्तींचे रंगकाम शेवटच्या टप्प्यात...


मुंबई : गणेशोत्सवानंतर आता सर्वत्र नवरात्रीचे (Navratri) वेध लागले आहेत. गरबा (Garaba) आणि दांडिया नाईट्ससाठी (Dandiya Nights) आतापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे. तर देवीही मखरात बसण्यासाठी सज्ज झाली आहे. यंदा १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेचा (Ghatsthapana) मुहूर्त आहे. वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये देवीच्या मूर्तीचे रंगकाम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. देवीच्या आगमनासाठी विविध सार्वजनिक मंडळेही उत्सुक झाली आहेत.


गणेशोत्सवाप्रमाणेच महाराष्ट्रात नवरात्रही विशेष लोकप्रिय आहे. नवरात्रीचे नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते तर काही भाविक श्रद्धेपोटी नऊ दिवस उपवासदेखील करतात. गुजरातमध्ये खेळला जाणारा गरबा आणि दांडिया हा प्रकारही महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. तसेच नवरात्रीतील नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांचे कपडे त्या त्या दिवशीच्या रंगांप्रमाणे घातले जातात. यामुळे एक सामाजिक एकीही दिसून येते.


यंदाही देवीच्या आगमनासाठी तयारी केली जात आहे. देवीच्या सुंदर आणि सुबक मूर्ती कार्यशाळांमधून तयार केल्या जात आहेत. अशाच मुंबईतील अनंत बंगाल यांच्या श्री गणेश आर्ट येथील कार्यशाळेत आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी फेरफटका मारला. तेथील देवीच्या मूर्तींची ही झलक खास प्रहारच्या वाचकांसाठी...



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने