India Vs Australia: विश्वचषकात भारताची आज पहिली परीक्षा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार सामना

चेन्नई: भारतीय संघ आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०२३मध्ये(world cup 2023) आपल्या अभियानाची सुरूवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(india vs australia) सामन्याने करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना आज ८ ऑक्टोबरला चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे तर भारतीय संघाने दोन वेळा. अशातच ऑस्ट्रेलिया संघात असे खेळाडू आहेत जे या महामुकाबल्यात टीम इंडियाचे टेन्शन वाढवू शकतात.


डेविड वॉर्नर - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नरला भारतात खेळण्याचा खूप अनुभव आहे. गेल्या काही काळापासून तो वनडे क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी करत आहे. दरम्यान, वनडे मालिकेत त्याने तीन सामन्यांत अर्धशतक ठोकले होते. त्यामुळे डेविड वॉर्नरला रोखणे हे भारतीयांसमोर मोठे आव्हान असणार आहे.


स्टीव्ह स्मिथ - या सामन्यात भारतासाठी सगळ्यात मोठा धोका म्हणजे स्टीव्ह स्मिथ. स्मिथने भारताविरुद्ध आतापर्यंत २७ वनडे सामन्यात १२६० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५४.७८ इतकी आहे. क्रीजवर सेट झाल्यानंतर स्मिथला बाद करणे कठीण असते.


मिचेल स्टार्क - या गोलंदाजापासून भारताला सावध राहावे लागेल. स्टार्क खासकरून टीम इंडियाचे सलामीवीर आणि स्टार फलंदाजांना आपली शिकार बनवतो. भारताविरुद्ध १७ वनडे सामन्यात स्टार्कने २६ विकेट घेतल्या आहेत.


पॅट कमिन्स - ऑस्ट्रेलियाचचा कर्णधार पॅट कमिन्सचे नाव दमदार गोलंदाजांमध्ये घेतले जाते. पॅट कमिन्सवर ताबा मिळवणे कठीण आहे. त्याने भारताविरुद्धच्या १९ वनडे सामन्यात २६ विकेट घेतल्या आहेत.


अॅडम झाम्पा - ऑस्ट्रेलियाला लेग स्पिनर अॅडम झाम्पा भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो. झाम्पाने २१ वनडे सामन्यात भारताने ३४ विकेट घेतलेत.


भारत : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, शार्दूल ठाकुर.


ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव स्मिथ, एलेक्स कॅरी, जोश हेझलवुड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्नस लाबुशेन, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, एडम जाम्पा, मिचेल स्टार्क.

Comments
Add Comment

INDW vs ZIMW: नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, कर्णधार स्मृती मंधानाने गोलंदाजी निवडत म्हणाली..

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना होत आहे. कर्णधार स्मृती मंधानाने पूर्णवेळ कर्णधारपदाची

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाने हुकमी एक्का काढला, झालं असं की..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल करण्यात

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं