Nitesh Rane : काही शेंबडे शिवाजी पार्कवर काँग्रेसचे गुणगान गाणार!

आम्हाला शिव्याशाप देणारे हे चायनीज मॉडेल हिंदुत्ववादी


संजय राऊत तुम्ही गजनी चित्रपटाच्या हिरोप्रमाणे अंगावर लिहा की...


आमदार नितेश राणे यांची सणसणीत टीका


मुंबई : आजचा सामनाचा अग्रलेख वाचल्यानंतर हे स्पष्ट झालं आहे की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांचा राजकीय लव्ह जिहाद झालेला आहे. याचं कारण असं की, नवरात्रीच्या काळात गरबा आणि दांडियाचं आयोजन करणार्‍या आयोजकांना जेव्हा आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने आवाहन केलं की, आतमध्ये खेळण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी येणारे लोक हिंदूच आहेत यासाठी आधारकार्ड तपासा आणि मगच त्यांना आत पाठवा. यावर जे 'हिंदूद्वेषी' आहेत ते बोलले, अशी सणसणीत टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. आजच्या पत्रकार परिषदेत हिंदूंचा द्वेष करणार्‍या उबाठाच्या नेत्यांना नितेश राणे यांनी चांगलेच फटकारले.


नितेश राणे म्हणाले, हिंदूद्वेषींचा मालक मविआच्या काळात मुख्यमंत्री असताना सर्वांत जास्त हिंदू सणांवरच निर्बंध आणले गेले. पण महायुतीच्या काळात आम्ही हिंदूंची बाजू घेऊन मोठ्या प्रमाणावर हिंदू सण साजरे करत असू तर आम्हाला शिव्याशाप देणारे हे चायनीज मॉडेल हिंदुत्ववादी आहेत. ते औरंगजेबाच्या विरोधात बोलत नाहीत, सनातन धर्माचा अपमान झाला तरी यांनी हिंदूंची बाजू घेतली नाही. जे काम हमास पॅलेस्टाईनमध्ये करत आहे, तीच भूमिका काँग्रेस आपल्या देशामध्ये बजावत असतानाही त्या काँग्रेसला कधी खडे बोल ऐकवताना यांना आपण ऐकलं नाही. जे दोन ओवेसी बंधू सतत हिंदूंविषयी गरळ ओकतात त्यांची थोबाडं बंद करण्याची यांच्यात हिंमत नाही आणि कोणी हिंदूंची बाजू घेत असेल तर लगेच यांना मिरच्या झोंबतात, अशी टीका नितेश राणे यांनी केली.



गजनी चित्रपटाच्या हिरोप्रमाणे अंगावर लिहा की...


आज सकाळी राम मंदिराविषयी बोलताना हे आम्ही त्या ठिकाण होतो, आम्ही हे केलं, ते केलं असे दाखले देत होते. या गजनी झालेल्या संजय राजाराम राऊतला मी सांगेन की गजनी चित्रपटात आमिर खान जसं अंगावर लिहून ठेवतो तसं अंगावर लिहा की राम मंदिराचं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा संजय राऊत लोकप्रभामध्ये बसून राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या पूर्ण विरोधात लेख लिहित होता. माझ्याकडे ते लेख आहेत. ते त्याच्या शरीरावर चिकटवून मी त्याला मुंबईभर फिरायला लावू शकतो.



राम जन्मभूमी आंदोलनावेळी तुम्ही गोधडी ओली करायचं काम करायचे


उद्धव ठाकरे तर राम जन्मभूमी आंदोलनावेळी घरात बसून कॅमेरा साफ करायचे, त्यामुळे त्यांचा आणि राम जन्मभूमीचा काही संबंधच नाही. असे लोक जेव्हा आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विचारतात की तुम्ही नेमकं काय केलं, तेव्हा लक्षात घ्या की राम जन्मभूमी आंदोलनावेळी तुम्ही गोधडी ओली करायचं काम करायचे, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.



काही शेंबडे लोक एकत्र येऊन शिवाजी पार्कवर काँग्रेसचे गुणगान गाणार


ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क देण्यात आले यावर नितेश राणे म्हणाले की, काही शेंबडे लोक एकत्र येऊन काँग्रेसचे गुणगान गाणार असतील, हमासने पॅलेस्टाईनमध्ये किती चांगलं काम केलं हे बोलण्यासाठी उद्धव ठाकरे तिथे येऊन भाषण देणार असतील तर अशा शेंबड्या लोकांना थोडं बोलू द्यावं म्हणून महानगरपालिकेने त्यांना परवानगी दिली असेल, त्यात काही मोठी गोष्ट नाही. अशा कितीतरी मित्रमंडळांच्या सभा मुंबईमध्ये सगळीकडे होतच असतात.



राणे साहेबांना देखील दोनदा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला


शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंनी जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा गौप्यसेफोट केला. यावर नितेश राणे म्हणाले की, हा गौप्यसेफोट नाही तर ते खरंच आहे. नारायण राणे साहेबांनी देखील जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना मारण्याचा दोनदा प्रयत्न करण्यात आला. हे राणे साहेबांनी देखील वारंवार सांगितलं आहे आणि आम्हीही सांगत आहोत. उद्धव ठाकरे हा माणूसच असा आहे, त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या लोकांनी का सहानुभूती दाखवावी, हा मोठा प्रश्न आहे, असं नितेश राणे म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता