Urvashi Rautela Iphone : उर्वशी रौतेलाचा फोन चोरणार्‍याने तिच्याकडे मेलद्वारे केली एक मागणी; म्हणाला, माझ्या भावाला तू...

उर्वशीनेही केले थम्स अप


मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील सामना पाहण्यासाठी अहमदाबाद (Ahmedabad) येथे गेली असताना तिचा महागडा फोन चोरीला गेल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी आली होती. उर्वशीनेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन (Social Media account) यासंबंधी माहिती दिली होती. तिने पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली होती. त्यानंतर आता चोराने थेट उर्वशीला एक मेल केला आहे. त्यात त्याने एक मागणी केली आहे. ती मागणी उर्वशीने पूर्ण केली तर मोबाईल परत करेन असं चोराने या मेलमध्ये म्हटलं आहे.


उर्वशी ही बॉलिवूडच्या सुंदर आणि श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे तिचा फोनही तितकाच महागडा होता. २४ कॅरेट सोन्याने मढवलेला आयफोन (Iphone) ती वापरत होती. हा आयफोन चोरीला गेल्याने तिला धक्का बसला होता आणि तिने सोशल मीडियावर चोरीची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. कोणाला फोन सापडला तर ताबडतोब संपर्क साधा, असे आवाहनही तिने यामार्फत केले होते.


उर्वशीच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, सोबतच फोन चोरी करणार्‍याने एक मागणीही केली आहे. ग्रो ट्रेडर्स (Groww Traders) या नावाने उर्वशीला मेल आला आहे. त्याचा स्क्रीनशॉट (Screenshot) तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मेलमध्ये असे म्हटले आहे की, 'तुमचा फोन माझ्याजवळ आहे. तुम्हाला फोन परत हवा असेल तर माझी मदत करावी लागेल. माझ्या भावाला कॅन्सर (Cancer) आहे, त्याचा उपचार करा' असा मेल चोराने केला आहे. चोराच्या या मेलचा स्क्रीनशॉट शेअर करत उर्वशीने थम्स-अपच्या इमोजीने रिप्लाय दिला आहे.


सोशल मीडियावर तिने स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिला पोलिसात जाण्याचा सल्ला दिला. आयपी अॅड्रेसच्या मदतीने पोलीस चोराला पकडू शकतात, असे नेटकऱ्यांनी उर्वशीला सांगितले. मात्र, उर्वशीने चोराच्या मेलबाबत पोलिसांना सांगितले की नाही, याबाबत अद्याप कोणताही माहिती नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

BMC Water Pipeline Leakage : पाणी गळती दुरुस्तीच्या कामांसाठी घाटकोपरला २७ कोटींचा ‘बूस्टर’!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर भागातील जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या जल

Kandivali : स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन बस अपघातातील जखमी युवकावर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचारास नकार!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मालाड – मार्वे रोड, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१

Kandivali : कांदिवलीतील डॉ.बाबासाहेब रुग्णालयातील साहित्य खरेदीत गैरव्यवहार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या कांदिवलीतील (Kandivali) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापालिका

BMC : घाटकोपर, मानखुर्द चेंबूर परिसरातील ०६ अनधिकृत लॉजवर जप्तीची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अनधिकृत व्यवसाय आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे. या

मुंबईत ५१ दिवसांमध्ये १६,१५३ बॅनरांची फाडाफाडी

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या बॅनरबाजांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असून