Wagh Bakri Group : वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं निधन

भटक्या कुत्र्यांनी केला होता हल्ला... उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली


अहमदाबाद : गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड वाघ बकरी (Gujarat Tea Processors & Packers Ltd. Wagh Bakri tea) या प्रतिष्ठित चहा ब्रँडचे ​​कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी अहमदाबाद (Ahmedabad) येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. पराग यांच्यावर काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


पराग यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग देसाई १५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराजवळील इस्कॉन रोडजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते, तेव्हाच त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली. ते चालत असताना अचानक काही भटक्या कुत्र्यांनी (Dog Attack) त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. ज्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज (Brain Hemorrhage) झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना उपचारांसाठी अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली यामुळे त्यांना उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं.


पराग यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटर (Ventilator) वर ठेवण्यात आलं होतं. मात्र, डोक्याला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की शस्त्रक्रियेनंतरही त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली आणि काल रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू आधी सात दिवस ते व्हेंटीलेटरवर होते.



ब्रँडला एका उंचीवर नेण्यात पराग यांचे मोलाचे योगदान


अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड युनिव्हर्सिटीमधूल एमबीएची पदवी घेतलेले पराग देसाई हे वाघ बकरी चहा व्यवसायातील चौथी पिढी होते. चहाची विक्री, वितरण आणि निर्यात यामध्ये मोलाची भूमिका बजावत त्यांनी ब्रँडला एका उंचीवर नेलं होतं. सध्या ते कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनाने वाघ बकरी कंपनीवर शोककळा पसरली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी