Health: उकडलेले अंडे की ऑम्लेट...काय आहे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर?

मुंबई: अनेकजण आपल्या ब्रेकफास्टमध्ये अंडी खाणे पसंत करतात. अंडे चवदार असण्यासोबतच हेल्दीही आहे. यात व्हिटामिन्स, आर्यन आणि प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. मात्र आजही लोकांना असा प्रश्न पडतो की उकडलेले अंडे चांगले की अंड्याचे ऑम्लेट. काहींच्या मते उकडलेले अंडे आरोग्यासाठी फायदेशीर असते तर काहींच्या मते अंड्याचे ऑम्लेट चांगले असते. जाणून घेऊया...



उकडलेले अंडे


उकडलेले अंडे हा नाश्त्याचा एक सोपा प्रकार आहे. यात खास तयारीची गरज नसते. उकडलेले अंडेही पौष्टिक असते. यात खालीलप्रकारे पोषक तत्वे असतात.


प्रोटीन - अंडी हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो. एका उकडलेल्या अंड्यामध्ये ६ ग्रॅम प्रोटीन असते.


व्हिटामिन डी - अंड्यामध्येही व्हिटामिन डी आढळते. एका उकडलेल्या अंड्यात ६ टक्के व्हिटामिन डी असते.


कोलीन - अंडे कोलीनचा चांगला स्त्रोत आहे जे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय फायदेशीर आहे.


ल्यूटिन आणि जेक्सँथिन - हे दोन अँटीऑक्सिडंट अंडयामध्ये आढळतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे.



ऑम्लेट खाण्याचे फायदे


नाश्त्यामध्ये अनेकांना ऑम्लेट खाणे पसंत आहे. ऑम्लेट हे चवीला अतिशय सुंदर लागते तसेच हेल्दीही असते. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे ऑम्लेट बनवू शकता. यात तुम्ही भरपूर भाज्या, चिकन, तसेच दुसऱ्या गोष्टी टाकून बनवू शकता.


फायबर - भाज्यांनी भरपूर असलेले ऑम्लेट हा फायबरचा मोठा स्त्रोत आहे. यामुळे पाचनसंस्था सुरक्षित राहते. तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी राहण्यासही मदत होते.


आर्यन - हे अतिशय आवश्यक खनिज आहे जे लाल रक्तपेशी बनवण्यासोबतच संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम करते. पालकने भरलेले ऑम्लेट आर्यनचा चांगला स्त्रोत आहे.


व्हिटामिन सी - भाज्यांनी भरलेले ऑम्लेट हा व्हिटामिन सीचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. व्हिटामिन सी अँटी ऑक्सिडंट म्हणूनही काम करते.


हेल्दी फॅट - अंड्यामध्ये हेल्दी फॅट असते. यात मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटचा समावेश आहे. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.



तुमच्या आरोग्यासाठी काय चांगले?


उकडलेले अंडे अथवा ऑम्लेट दोन्हीही शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानली जातात. उकडलेल्या अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटामिन डी आणि कोलीन मोठ्या प्रमाणात असते तर ऑम्लेटमध्ये फायबर, आर्यन, व्हिटामिन सी आणि हेल्दी फॅट मोठ्या प्रमाणत असातात. जर तुम्हाला डाएटमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे असेल तर ब्रेकफास्टसाठी उकडलेले अंडे उत्तम पर्याय आहे. तुम्हाला विविध प्रकारची पोषकतत्वे हवी असतील तर ऑम्लेट खाऊ शकता.


Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर