NZ vs SL: सेमीफायनलचे तिकीट कन्फर्म करण्यासाठी उतरणार न्यूझीलंड, श्रीलंकेविरुद्ध सामना

बंगळुरू: विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) आजचा सामना अतिशय खास असणार आहे. सेमीफायनलमध्ये चौथा संघ कोणता असणार आहे याचे थोडेफार चित्र आज स्पष्ट होऊ शकते. जर न्यूझीलंडच्या संघाला श्रीलंकेविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवण्यात यश मिळाले तर त्यांचे सेमीफायनलमध्ये खेळणे निश्चित होऊ शकते. दरम्यान, थोड्याशा फरकाने विजय अथवा पराभव त्यांना सेमीफायनलमधून बाहेर ढकलू शकतात. अशातच न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.


दुसरीकडे श्रीलंकेसाठीही हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. श्रीलंकेचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. मात्र त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५साठी पात्र ठरायचे असेल तर पॉईंट्स टेबलमध्ये टॉप ८ मध्ये राहणे गरजेचे आहे. जर तुम्ही असे करू शकत नाही तर त्यांच्या हातून चॅम्पियन्स ट्रॉफीचे तिकीट निघून जाईल. टॉप ८मध्ये येण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकावाच लागेल.



कशी असणार दोन्ही संघांची प्लेईंग ११


न्यूझीलंडच्या संघात आज वेगवान गोलंदाज लौकी फर्ग्युसनचे पुनरागमन होऊ शकते. त्याच्यासोबत काईल जेमीसनही मैदानात दिसू शकतो. केन विल्यमसन्सला गेल्या सामन्यात दुखापत झाली होती. मात्र मोठ्या सामन्यात तो खेळताना दिसू शकतो.


न्यूझीलंडचे संभाव्य प्लेईंग ११ - डेवोन कॉनवे, रचिन रविंद्र, केन विलियमसन (कर्णधार), डेरिल मिचेल, टॉम लाथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चैपमॅन, मिचेल सेंटनर, ईश सोढ़ी/काइल जेमीसन, ट्रेंट बोल्ट, टिम साउदी/लॉकी फर्ग्यूसन.


श्रीलंकेचे संभाव्य प्लेईंग ११ - पाथुम निसंका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार), सादीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, एंजेलो मॅथ्यूज, धनंजय डिसिल्वा, महीष तीक्ष्णा, कासुन राजिथा, दुष्मंथा चमिरा, दिलशान मदुशंका.

Comments
Add Comment

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या