November Bank Holidays : बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी जोमात! पाच दिवस बँकांना राहणार सुट्टी...

जाणून घ्या बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक


मुंबई : राज्यात दिवाळीच्या सणामुळे (Diwali festival) सारं काही उजळून निघालं आहे. रांगोळ्या, आकाशकंदील, पणत्या, दिवे यांमुळे लखलखाट झाला आहे. बँक कर्मचाऱ्यांना (Banking staff) देखील ही दिवाळी आपल्या घरच्यांसमवेत साजरी करता यावी यासाठी दिवाळीत पाच दिवस सुट्टी राहणार आहे. शिवाय नोव्हेंबर महिन्यातील इतर सुट्ट्या पकडून १५ दिवस म्हणजे जवळजवळ अर्धा महिना बँका (November 2023 Bank Holidays) बंद असणार आहेत. मात्र, या दिवसांत UPI, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवा (Digital Banking) उपलब्ध राहतील.


देशभरातील अनेक राज्यांमध्ये आजपासून पाच दिवस बँका बंद (Bank Holidays) राहणार आहेत. यंदाच्या दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने आज होतेय आणि १५ नोव्हेंबरला भाऊबीजला दिवाळी संपते. आरबीआयच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, शुक्रवारपासून सलग सहा दिवस बँका बंद असतील. त्याशिवाय दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी बँकांची नियमित सुट्टी असणार आहे.


नोव्हेंबरमध्येच, चित्रगुप्त जयंती, दिवाळी, छठ पूजा, गुरु नानक जयंती, कार्तिका पौर्णिमा, कनकदास जयंती या प्रसंगी बँकांनी सुट्टी असणार आहे. विविध सण आणि राष्ट्रीय कार्यक्रम निमित्त नोव्हेंबरमध्ये अनेक राज्यांमध्ये १५ दिवस बँका बंद राहतील. पुढीलप्रमाणे बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक असणार आहे. त्यामुळे बँकेत जायचा विचार करत असाल तर आधी हे वेळापत्रक पाहून खात्री करुन घ्या.




  • ११ नोव्हेंबर (शनिवार) - दुसऱ्या शनिवारी बँकांची नियमित सुट्टी

  • १२ नोव्हेंबर (रविवार) - रविवारमुळे बँका बंद

  • १३ नोव्हेंबर (सोमवार) - गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा, (दीपावली)/दिवाळी यानिमित्त त्रिपुरा, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात बँका बंद राहतील.

  • १४ नोव्हेंबर (मंगळवार) - दिवाळी (बलिप्रतिपदा) – गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, सिक्कीम या राज्यांत बँका बंद राहतील.

  • १५ नोव्हेंबर (बुधवार) - भाऊबीज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / सेंग कुत्स्नेम यानिमित्त सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद आहेत.

  • १९ नोव्हेंबर (रविवार) - बँकांची नियमित सुट्टी

  • २० नोव्हेंबर : छठ पूजा असल्याने बिहारसह राजस्थानमध्ये बँकांना सुट्टी असेल.

  • २३ नोव्हेंबर : सेंग कुत्स्नेम आणि इगास बागवाल यांचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये सुट्टी असेल.

  • २५ नोव्हेंबर : या दिवशी चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.

  • २६ नोव्हेंबर : रविवारची सुट्टी

  • २७ नोव्हेंबर : गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे. त्रिपुरा, मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, नवी दिल्ली, बिहार, झारखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये या दिवशी सुट्टी असेल.

  • ३० नोव्हेंबर : कनकदास जयंती. कर्नाटकात या दिवशी बँका बंद राहणार आहेत.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि