Onkar Bhojane : माझं असंच आहे, मला वाटलं तर मी येतो, नाही तर मी येत नाही...

हास्यजत्रा सोडलेला ओंकार भोजने पुन्हा करणार एन्ट्री?


मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी प्रहसनांचा (Comedy skits) कार्यक्रम सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. यातील कलाकारांच्या विनोदाचं अचूक टायमिंग, नवनवीन विषय व ते हाताळताना प्रेक्षकांना हसवण्याची पद्धत यांमुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. यातील प्रत्येक कलाकाराने जी वेगवेगळी पात्रं रंगवली आहेत, तीदेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. यामध्ये नम्रता संभेरावची (Namrata Sambherao) लॉली असो, प्रसाद खांडेकरचा (Prasad Khandekar) स्लोमॅन, समीर चौघुलेचा (Samir Choughule) सुमारिया चौघुलिया किंवा लोचन मजनू अशी अनेक पात्रे प्रेक्षकांना खळखळून हसवतात.


याच हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळालेला कलाकार म्हणजे ओंकार भोजने (Onkar Bhojane). ओंकारने काही महिन्यांपूर्वी हास्यजत्रा सोडली होती. तो पुन्हा येणार नाही अशी चर्चा असल्याने प्रेक्षकांची चांगलीच निराशा झाली होती. ओंकारचं अगं अगं आई हे स्किट असो, किंवा वायरमॅन तात्या, किंवा वनिता खरातसोबत मामा मामीचं स्किट अशी ओंकारची सर्वच पात्रं प्रेक्षकांना आवडत असताना त्याने असा का ब्रेक घेतला असा प्रश्न पडला होता.


दरम्यान, ओंकारचे 'सरला एक कोटी' व 'बॉईज ४' असे दोन चित्रपट आले. या चित्रपटांच्या शूटिंगमुळेच हास्यजत्रेतून ब्रेक घ्यावा लागला असं त्याने स्पष्ट केलं आहे. यानंतर तो पुन्हा एकदा हास्यजत्रेतून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या नव्या स्किटचा प्रोमो आला असून यात ओंकार 'माझं असंच आहे, मला वाटलं तर मी येतो, नाही तर मी येत नाही...' असा एक डायलॉग म्हणतो आणि त्यावर सगळे खूप हसतात. म्हणजेच ओंकारची एन्ट्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे.


ओंकार भोजने याविषयी सांगतो की, 'सगळं छान सुरु होतं, पण मला पुढे दोन चित्रपटांसाठी थांबायचं होतं. त्यांना पण अॅडजेस्टमेंट करावी लागणार होती. माझ्या प्रकृतीच्या पण काही तक्रारी होत्या. तेव्हा सुट्टी घेतली ती कायमचीच. नंतर मी फू बाई फू मध्ये काम केलं. मी या सगळ्यामधून शिकत आहे.' ओंकार भोजने आता हास्यजत्रेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने