शासनाची फसवणूक करणार्‍या उबाठाच्या अद्वय हिरे यांना भोपाळमध्ये अटक

साडेसात कोटीच्या कर्जप्रकरणी दाखल गुन्ह्यात नाशिक पोलिसांनी घेतले ताब्यात


नाशिक : शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना आज सकाळी भोपाळ येथे ताब्यात घेण्यात आले. त्यांनी मालेगाव येथील रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र ते न फेडल्याने हा आकडा ३० कोटीच्या घरात पोहोचला आहे. या प्रकरणात त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे रमजान पुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याशिवाय हिरे कुटुंबातील सदस्यांनी शासनाची फसवणूक करून शिक्षक भरती केल्याचा देखील आरोप आहे. शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील यांनी कोणतीही खातरजमा न करता प्रस्ताव मंजूर केल्याने किरण कुवर यांनी यापूर्वी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सर्वांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे, तथापि रेणुका सूतगिरणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे हिरे यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र त्यांचा जामीन नुकताच फेटाळण्यात आला, त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होतं. मालेगाव पोलीस त्यांचा शोध घेत असताना ते भोपाळ येथे असल्याचे समजले, तेथे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि