IND vs AUS T20I: २३ नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान ५ सामन्यांची टी-२० मालिका

मुंबई: विश्वचषक २०२३(world cup 2023) जरी संपला असला तरी क्रिकेटचा फिव्हर संपलेला नाही. २३ नोव्हेंबर गुरूवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना ३ डिसेंबर रविवारी खेळवला जाईल. मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर भारताच्या संघाची घोषणा होणे बाकी आहे. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मॅथ्यू वेड करत आहे.


बीसीसीआयकडून लववकरच भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार भारताचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड अथवा सूर्यकुमार यादव सांभाळू शकतात. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.


भारतीय स्क्वॉडमध्ये यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, तिलक वर्मा आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या रियाग पराग सारख्या फलंदाजांना संधी मिळू शकते. तर संजू सॅमसन विकेटकीपर म्हणून पुनरागमन करू शकतो आणि जितेश शर्मा बॅकअप विकेटकीपर होऊ शकतो. तर गोलंदाजीत मुकेश कुमार, अर्शदीप सिंह आणि रवी बिश्नोई सारखे गोलंदाज सामील होऊ शकतात.



असे आहे वेळापत्रक


पहिला सामना २३ नोव्हेंबर, गुरूवार, राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
दुसरा सामना - २६ नोव्हेंबर, रविवार, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरूअनंतपुरम
तिसरा सामना - २८ नोव्हेंबर, मंगळवार, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
चौथा सामना - १ डिसेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राऊंड, नागपूर
पाचवा सामना - ३ डिसेंबर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद



टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ


मॅथ्यू वेड(कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेविड, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, सीन एबॉट, जोश इंग्लिश, तनवीर सांघा, नाथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉनसन, एडम झाम्पा



भारताचा संभाव्य संघ


सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन(विकेटकीपर), रवी बिश्नोई, यशस्वी जैसवल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा, जितेश वर्मा(विकेटकीपर), अर्शदीप सिंह, रिंकू सिंह, रियान पराग, रवी बिश्नोईस,युझवेंद्र चहल, मुकेश कुमार

Comments
Add Comment

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला