IND vs AUS 2nd T20: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा आज दुसरा मुकाबला

मुंबई: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज २६ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्या सामन्यात दोन विकेटनी रोमहर्षक विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यातील विजयासह भारत या मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. दुसरा टी-२० सामनाच संध्याकाळी ७ वाजता तिरूअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये असेल.



भारतीय फलंदाज पुन्हा करणार धावांचा पाऊस


टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात धावांचा पाऊस पडला होता तसेच ४००हून अधिक धावा झाला होत्या. फलंदाजी कर्णधार सूर्यकुमार यादव, ईशान किशन, रिंकू सिंह आणि यशस्वी जयसवालने चांगली कामगिरी केली होती. भारताला या सामन्यातही या तिघांकडू चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. पहिल्या सामन्यात रनआऊट होणारे ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माही चांगली खेळी कऱण्याचा प्रयत्न करतील.


या सामन्यात भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. विशाखापट्टणम मध्ये टी-२०मध्ये गोलंदाज अर्शदीप सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी अनुक्रमे १०.२५ आणि १२.५०च्या सरासरीने धावा दिल्या होत्या. मात्र या तीन गोलंदाजीत विविधतेचा अभाव आहे.


ऑस्ट्रेलियाबाबत बोलायचे झाल्यास जोश इंग्लिशने शतक ठोकत टी-२० वर्ल्डकप पाहता चांगले संकेत दिले होते. तर ओपनिंग करणारा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने अर्धशतकी खेळी केली होती. दरम्यान, गोलंदाजी काँगारूच्या गोलंदाजाची स्थिती खराब होती.


भारताचे संभाव्य प्लेईंग ११ - ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैसवाल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार.


ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेईंग ११ - मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिश, एरॉन हार्डी, मार्कस स्टॉयनिस, टीम डेविड, मॅथ्यू वेड, सीन एबॉट, नाथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, अॅडम झाम्पा.

Comments
Add Comment

Asian Games 2026 : एशियन गेम्समध्ये भारताचा डंका! मनू भाकर आणि तजिंदरपाल सिंग तूर भूषवणार ध्वजधारकाचा मान

जपानमधील नागोया येथे होणाऱ्या 'आशियाई खेळ २०२६' च्या (Asian Games 2026) भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजधारक म्हणून

Messi historic goal : लिओनेल मेस्सीचा इंटर मियामीसाठी ऐतिहासिक १०० वा गोल; चमकदार कामगिरीच्या बळावर क्लबने पटकावला कॅम्पिओनेस कप

मियामी: फुटबॉल विश्वाचा महानायक आणि महान खेळाडू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपल्या नावावर एका विक्रमी

Abhishek Sharma Record : ३० चेंडूंत शतक! अभिषेक शर्माचा ऐतिहासिक पराक्रम; रोहित शर्माचा विक्रम मोडला

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०

County Championship : मानव सुथारच्या घातक फिरकीच्या बळावर वॉर्विकशायरची एसेक्सवर आठ गडी राखून शानदार मात

लंडन : भारतीय संघाकडून शानदार कसोटी पदार्पण करणारा युवा डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारने काउंटी

PM Modi birthday wishes : क्रीडा जगताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७६ व्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा

नवी दिल्ली :

Maharashtra sports policy : ऑलिम्पिक सुवर्णपदकासाठी आता पाच कोटींचे बक्षीस, महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी राज्य सरकारकडून सुधारित धोरण; आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समावेश

मुंबई : आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या