Ajit Pawar Vs Sharad Pawar : अजित पवार गटाचे विधीमंडळात २६० पानी तर शरद पवार गटाचे १० पानी उत्तर

आमदार अपात्रता प्रकरणी कोणाला मिळणार दिलासा?


मुंबई : सध्या विधीमंडळात शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेस (Rashtravadi Congress) या दोन्ही पक्षांमध्ये पडलेल्या फुटीबद्दल सुनावणी सुरु आहे. राष्ट्रवादीच्या निर्णयासाठी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) ३१ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे, तर शिवसेनेबद्दलच्या निर्णयासाठी ३१ डिसेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वतीने विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर करण्यात आले आहे. विधीमंडळात सादर केलेल्या उत्तरात राष्ट्रवादी मूळ आमचीच असा दावा अजित पवार गटाने केला आहे.


सरकारला साथ दिलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या पुढील सुनावणीसाठी विधीमंडळाने दीड-ते दोन महिन्यापूर्वी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटातील आमदारांना नोटीस बजावली. शरद पवार गटाच्या आमदारांनी नोटीसीला १० पानी उत्तर दिले आहे. तर अजित पवार गटाकडून २६० पानी उत्तर आलं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह चिन्हावर दावा ठोकला होता. राष्ट्रवादी आमदारांचं बहुमत आमच्याकडे असल्यामुळे आमचाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावाही केला होता. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील देखील आमच्यासोबत असल्यामुळे मूळ राष्ट्रवादी आमचीच आहे. त्यामुळे संख्याबळाच्या बाबतीत निर्णय घेतला जावा. अध्यक्ष यांनी तात्काळ निर्णय घ्यावा अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे. त्यामुळे कोणत्या गटाला दिलासा मिळतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने