Nitesh Rane : खरा खुनी काल विधानसभेत दिसला!

दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आमदार नितेश राणे कडाडले


संजय राऊतांवरही केला हल्लाबोल


नागपूर : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाने (Disha Salian Death) महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणी राज्य सरकारने मुंबई पोलिसांना आजच एसआयटी (SIT) समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि भाजप कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासह अनेक आमदारांनी या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) गंभीर आरोप केले आहेत. यात आदित्य ठाकरे अडचणीत सापडणार आहेत. कारण एसआयटी समितीदेखील लवकरच आदित्य ठाकरेंची कसून चौकशी करणार आहे, यातून सगळी सत्यता बाहेर पडणार आहे.


या सर्व पार्श्वभूमीवर आज नागपूर विधानसभा परिसरात आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. आदित्य आणि त्यांना समोरा समोर बोलवण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, "आम्ही तिसऱ्या गिअरवर गाडी टाकली आहे. जो खरा खुनी आहे तो काल विधानसभा परिसरात दिसला त्याच्यावर लवकर कारवाई होईल."


पुढे नितेश राणे म्हणाले, "काल खरा खुनी आपल्या वडिलांसोबत आला होता. सर्वांची उत्तरं या निमिताने बाहेर येणार आहेत. मी देखील थांबलो आहे. एसआयटी स्थापन झाल्या झाल्या आदित्य ठाकरे यांच्यासोबत मलादेखील बोलवा. आदित्य आणि मला समोरासमोर बोलवा", असं ओपन चॅलेंज नितेश राणे यांनी दिलं आहे.



अडीच वर्षांत काय गोट्या खेळत होते?


आदित्य ठाकरेला पोहोचवा असंच संजय राऊतला वाटतंय. अडीच वर्षे त्यांचं सरकार होते तेव्हा हे काय गोट्या खेळत होते. अनिल परब स्वतः म्हणाले १३ जूनला पार्टी होती. त्यांना देखील एसआयटी चौकशीत बोलवावे. दोन वेळा क्लोजर रिपोर्ट बदलला आहे. आयोगाला अनिल परब यांचे मालवणीत फोन येत होते की साक्ष बदला, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला. तुझ्या मालकाचे सरकार होते तेव्हा नागपूर, ठाणे महापालिकेत चौकशी का लावली नाही? खिचडी खाल्ली, मातोश्री चालवली ना? मग आता चौकशीला सामोरे जा, असंही नितेश राणे म्हणाले.



संजय राऊत मागासवर्गीय आयोगात चहा द्यायला जातो का?


भुजबळांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, संजय राऊत मागासवर्गीय आयोगात चहा द्यायला जातो का? राज्य सरकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे, मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार. संजय राऊतसारखे खिचडी चोर छगन भुजबळ नाहीत. संजय राऊत तुझी केस वेगळी आहे भुजबळ यांची वेगळी आहे, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी