TMKOC : मालिकेत पुन्हा ओरिजनल 'दयाबेन' दिसणार नाही!

'तारक मेहता का उलटा चष्मा'चे चाहते झाले नाराज


मुंबई : 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak Mehta ka Ooltah chashmah) ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यातील पात्रांमुळे आणि त्यातील विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांना ही मालिका अत्यंत जवळची वाटते. यातील जेठालाल आणि दयाबेनची (Jethalal and Dayaben) जोडी प्रेक्षकांना विशेष आवडते. मात्र, या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक नाराजीची बातमी समोर आली आहे. दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) यापुढे मालिकेत काम करणार नाही आहे. मालिकेच्या निर्मात्यांनीच ही माहिती दिली आहे.


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दिशा वकानीची एन्ट्री होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. दिशाची एन्ट्री होणार असल्याचे प्रोमो आऊट करण्यात आले. पण काही ना काही कारणाने दयाबेनच्या भूमिकेत दिशा दिसलेली नाही. त्यामुळे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे प्रेक्षक नाराज झाले. ते ही मालिका बॉयकॉट करण्याची मागणी करत होते.


अखेर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले की,"दिशासोबत माझं बोलणं झालं. पुन्हा कमबॅक करण्यासाठी तिने होकार दिला होता. पण शेवटच्या क्षणी तिचा निर्णय बदलला. त्यामुळे मालिकेत तिची एन्ट्री झाली नाही. दिशाचं कुटुंब आहे. तिला दोन लहान मुलं आहेत. तिच्या वैयक्तिक आयुष्याचाही आदर करायला हवा".


असित मोदी पुढे म्हणाले, "नव्या दयाबेनचा शोध सुरू आहे. ऑडिशन सुरू आहे. जेव्हा दयाबेनच्या भूमिकेसाठी एखाद्या अभिनेत्रीची निवड होईल तेव्हा चाहत्यांसोबत नक्कीच ही आनंदाची बातमी शेअर केली जाईल. खरं तर दिशाने आमच्यासोबत पुन्हा काम करावं, अशी आमची इच्छा आहे. दिशाने कमाल काम केलं आहे. तिच्यापेक्षा अधिक चांगलं काम करणारं अद्याप आम्हाला कोणी सापडलेलं नाही", असं त्यांनी सांगितलं.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’