Nana Patekar : देशाला भाजपशिवाय पर्याय नाही, पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार

अभिनेते नाना पाटेकर यांचं मोठं वक्तव्य


मुंबई : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हल्ली त्यांच्या अनेक राजकीय वक्तव्यांमुळे (Political statements) चर्चेत येत राहतात. त्यांचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला 'द व्हॅक्सिन वॉर' (The vaccine war) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकला नाही. सध्या ते त्यांच्या आगामी 'ओले आले' (Ole ale) या मराठी चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यातच त्यांनी एक राजकीय भाकीत केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच निवडून येणार', असा दावा त्यांनी केला आहे.


एका वाहिनीच्या पत्रकाराने त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांविषयी काय वाटतं, असा प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पाटेकर म्हणाले, "आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला साडे तीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील. देशभरात हे सरकार शानदार काम करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना यश नक्कीच मिळेल. तसेच भाजपाला पर्याय नाही. भाजपला बहुमत मिळणार आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार, यात काही शंका नाही", असं वक्तव्य नाना यांनी केलं आहे.





पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं. चारपैकी तीन राज्यांत भाजपने बाजी मारली. ही निवडणूक लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजली जात होती. त्यात घवघवीत यश मिळवल्याने भाजप लोकसभा निवडणुकीतही घवघवीत यश मिळवण्याच्या मार्गावर आहे. त्यातच नाना पाटेकर यांनी भाजपला बहुमत मिळणार असं वक्तव्य केल्याने आता हे भाकीत खरं ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी