Marathi Celebrities Marriage : मराठी कलाकारांची नववर्षातही लगीनघाई; टाईमपासमधला दगडू तर झिम्मा २ मधील शिवानी अडकणार लग्नबंधनात

मुंबई : सरत्या वर्षात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ (Marathi Celebrities Marriage) बांधली आणि त्यांची लग्नं बरीच चर्चेत राहिली. मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे, गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी, अमृता देशपांडे-प्रसाद जवादे यांच्यासोबतच पूजा सावंतनेही लवकरच तिचा बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणसोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे गेल्या वर्षात मराठी सिनेसृष्टीत लगीनघाई पाहायला मिळाली. पण आता नव्या वर्षातही (New year) ही लगीनघाई सुरुच राहणार असल्याची चिन्हे आहेत. कारण नववर्षात मराठीतील आणखी दोन जोडप्यांनी लग्नाची घोषणा केली आहे.



टाईमपासमधल्या दगडूला मिळाली प्राजू


अभिनेता प्रथमेश परब (Prathmesh Parab) म्हणजेच सगळ्यांचा लाडका दगडू त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत (Kshitija Ghosalkar) यावर्षी लग्नगाठ बांधणार आहे. केळवणाची एक पोस्ट शेअर करत त्याने ही घोषणा केली आहे. '#pratija चं ठरलं. लग्नाची तारीख लवकरच कळवतो. तारीख खूप स्पेशल आहे आणि हिंट कॅप्शनमध्येच आहे', असं त्याने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. यासोबतच त्याने नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांच्या नावाचा मिळून #pratija असा हॅशटॅग त्याने वापरला आहे.





प्रथमेशने मागच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला (Valentine Day) प्रेमाची कबुली दिली होती. दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. प्रथमेशसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी क्षितिजा त्याच्या चित्रपटांची खूप मोठी फॅन होती. ती सध्या मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे. तसंच ती समाजकार्यदेखील करते. गेल्या तीन वर्षांपासून प्रथमेश आणि क्षितिजा एकमेकांना डेट करत आहेत. प्रथमेश परबच्या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.



तब्बल ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अखेर शिवानी-अजिंक्यचं ठरलं!


अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आठ वर्षे एकमेकांसोबत राहिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सध्या ते पाँडिचेरीमध्ये एकत्र वेळ घालवत आहेत. याच ट्रीपदरम्यानचा त्यांचा एकत्र सेल्फी शिवानीने आपल्या स्टोरीवर शेअर केला आहे. 'तुझी गर्लफ्रेंड म्हणून हे शेवटचं वर्ष', असं कॅप्शन तिने या सेल्फीला दिलं आहे. म्हणजेच यंदाच्या वर्षात ती अजिंक्यची पत्नी होणार आहे. यावर्षी ते लग्नगाठ बांधणार असल्याचं या कॅप्शनमधून या जोडप्याला सुचवायचं आहे.



दोघांची पहिली भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. तेव्हापासून दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये शिवानी साड्यांची खरेदी करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. याशिवाय शिवानीने काही दिवसांपूर्वीच सुरेखा तळवलकरांच्या ‘दिल के करींब’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी शिवानीने “लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल…सगळ्या गोष्टी ठरल्या आहेत” असं सांगितलं होतं. त्यामुळे आता शिवानी-अजिंक्य लग्नाची तारीख केव्हा जाहीर करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.



दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, शिवानी सुर्वेचे गेल्या वर्षातील वाळवी आणि झिम्मा २ हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. तर अजिंक्य ननवारे सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने