Neha Pendse : प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी सहा लाखांच्या दागिन्यांची चोरी!

पोलिसांनी एका नोकराला घेतलं ताब्यात


मुंबई : हल्ली सिनेकलांकारांसोबत (Movie actors) चोरीचे तसेच सायबर क्राईमच्या (Cyber Crime) माध्यमातून लाखो, करोडो रुपयांचा गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिच्या घरी चोरी झाली आहे. वांद्रे (Bandra) येथील तिच्या राहत्या घरातून तब्बल सहा लाखांचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी नेहा पेंडसेच्या पतीच्या ड्रायव्हरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


वांद्रे पश्चिम येथे अरेटो बिल्डिंगमध्ये नेहाचा व तिचा पती शार्दुल सिंह बयास यांचा आलिशान फ्लॅट आहे. या फ्लॅटमधून काही दागिने चोरीला गेले आहेत. यामध्ये लग्नात त्यांना मिळालेलं एक सोन्याचं कडं आणि एक हिऱ्यांची अंगठी याचा समावेश आहे. त्यांची किंमत तब्बल सहा लाख आहे. या प्रकरणी नेहाचा पती शार्दुल याचा ड्रायव्हर रत्नेश झा याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


२८ डिसेंबर रोजी शार्दुलच्या लक्षात आलं की, कपाटात असणारं सोन्याचं कडं आणि एक हिऱ्यांची अंगठी गायब होती. अनेकदा शार्दुल हे कडं आणि अंगठी घालायचा आणि कपाटात काढून ठेवायचा. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने या दोन्ही वस्तू घरात काम करणाऱ्या सुमीत नावाच्या कर्मचाऱ्याकडे दिल्या आणि त्याला त्या कपाटात ठेवायला सांगितल्या. पण त्या वस्तू नंतर कपाटात मिळाल्याच नाहीत.


या प्रकरणी शार्दुलने घरातल्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. परंतु त्यापैकी कोणाकडूनच दागिन्यांविषयी काही माहिती मिळाली नाही किंवा त्यांच्याकडे दागिने सापडले नाहीत. या चौकशीवेळी सुमीत मात्र अनुपस्थित होता, त्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावला. त्याला फोन केला असता, त्याने तो कुलाबा इथे मावशीकडे आल्याचं सांगितलं आणि घरी येण्यास टाळाटाळ केली. सुरुवातीला त्याने दागिने कपाटात ठेवल्याचं सांगितलं. पण दागिने नसल्याने शार्दुल यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी सुमीत नावाच्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म