IND vs AFG: ११ जानेवारीपासून भारत-अफगाणिस्तान मालिका होणार सुरू, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई: २०२४ या वर्षात टी-२० मालिकेची सुरुवात भारत अफगाणिस्तानविरुद्ध करत आहे. या मालिकेत भारतीय संघात कोणते चेहरे असणार हे स्पष्ट झाले आबे. ११ जानेवारीपासून या मालिकेला सुरूवात होत आहे. दोन्ही संघांची यासाठी घोषणा झालेली आहे. जाणून घेऊया या मालिकेबद्दल...


भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना ११ जानेवारीला मोहालीमध्ये खेळवला जाईल. या सामन्याची सुरूवात संध्याकाळी सात वाजल्यापासून होईल. यानंतर दोन्ही संघ इंदोरला जाणार आहेत. येथे दुसरा टी-२० सामना खेळवला जाईल. मालिकेतील शेवटचा आणि तिसरा टी-२० सामना बंगळुरूच्या के एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. हे सर्व सामने संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होतील.



टी-२०मध्ये रोहित, विराटचे पुनरागमन


अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे. त्यांच्यासोबत स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीचेही संघात पुनरागमन होत आहे. दोघेही दीर्घकाळानंतर भारतासाठी या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. यासोबतच हे स्पष्ट होत आहे की दोन्ही खेळाडू २०२४ टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा भाग असणार आहेत.



भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेचे वेळापत्रक


पहिला टी-२० सामना ११ जानेवारी -मोहाली
दुसरा टी-२० सामना १४ जानेवारी - इंदौर
तिसरा टी-२० सामना १७ जानेवारी - बंगळुरू


अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्वोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि आवेश खान.


भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ - इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमतुल्लाह ओमरजई, शरफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नैब आणि रशीद खान.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून