Navra Maza Navsacha 2 : 'सरप्राईज!' म्हणत सचिन पिळगावकरांची मोठी घोषणा!

'नवरा माझा नवसाचा २' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; तब्बल १९ वर्षांनी येतोय दुसरा भाग


मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव म्हणजे सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar). त्यांचे अशी ही बनवाबनवी, गंमत जंमत, एकापेक्षा एक, आयत्या घरात घरोबा असे एक ना अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. त्यातील एक म्हणजे दोन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेला चित्रपट 'नवरा माझा नवसाचा' (Navra Maza Navsacha). १९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे संवाद व गाणी आजही चाहत्यांना तोंडपाठ आहेत. या चाहत्यांसाठी सचिन पिळगांवकर एक खुशखबर घेऊन आले आहेत. तब्बल १९ वर्षांनी 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सरप्राईज!' असं कॅप्शन देत सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.


‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील गाजलेलं पात्र म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी साकारलेला कंडक्टर. अशोक सराफ यांना नुकताच महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाच्या दुसर्‍या भागाचा उल्लेख केला. शिवाय आपणही याचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे, यात शंका नाही.


‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात आपल्याला गणपती पुळेपर्यंतच्या एसटीच्या प्रवासातील अतरंगी प्रवाशांची मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली आणि शेवटी बाप्पाचं दर्शन घडलं. आता नव्या भागात नवस फेडायला वॅकी नेमका कुठे जाणार? यामध्ये कोणकोणते ट्विस्ट असतील याचा उलगडा थेट चित्रपटगृहात होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील तगड्या स्टारकास्टची नावं समोर आली आहेत.





चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक तसेच प्रमुख अभिनेते सचिन पिळगावकर यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करून चित्रपटाची स्टारकास्ट जाहीर केली आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. आता हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याकडे मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांसह चित्रपटाच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.


Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा