Maratha reservation : दहा टक्के आरक्षण दिल्याबद्दल वर्षावर जल्लोष!

नाशिकसह महाराष्ट्रातील हजारो मराठा शिवसैनिकांचे मुख्यमंत्र्यांना धन्यवाद


नाशिक : गेली चाळीस वर्षे संघर्ष केल्यानंतर तसेच दोनदा न्यायालयीन लढाईत रद्द झाल्यानंतर मराठा समाजाला दहा टक्के टिकणारे आरक्षण (Maratha reservation) देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या (Maratha Samaj)भावनांना न्याय दिला या शब्दात नाशिक (Nashik) शिवसेना सहसंपर्कप्रमुख व छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.


२० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधी मंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ टक्के मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून हजार पेक्षा अधिक तर महाराष्ट्रातून पाच हजाराहून अधिक शिवसैनिकांनी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित हजारो शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.


"एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला संवेदनशील मुख्यमंत्री लाभले आहेत. मराठा समाजाच्या अनेक वर्षांच्या दुःखावर त्यांनी फुंकर घातली आहे. या निर्णयामुळे कुणबी वगळून उर्वरित मराठा समाजालाही न्याय मिळणार आहे."

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी