Sangeet Manapman : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर येतोय 'संगीत मानापमान'!

पोस्टर शेअर करत दिग्दर्शक सुबोध भावेने जाहीर केली प्रदर्शनाची तारीख


मुंबई : मराठी रंगभूमीवर (Marathi Rangbhumi) संगीत नाटके (Musical plays) विशेष गाजली. मराठी रंगभूमीचा प्रदीर्घ इत्हास सागंताना कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (Krishnaji Prabhakar Khadilkar) यांचे नाव हमखास निघते. मराठी रसिकांच्या मनात नाटकाचे अढळ स्थान निर्माण करण्यात त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. त्यांनी लिहिलेले 'संगीत मानापमान' (Sangeet Manapman) हे नाटक प्रचंड गाजले. आज या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ११३ वर्षे पूर्ण होत आहेत. हा मुहूर्त साधून प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने आगामी 'संगीत मानापमान' या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर १ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


सुबोध भावे याने आजवर आपल्या अनेकविध भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जीवनपट असो वा खलनायकी भूमिका सुबोधने प्रत्येक भूमिका आपल्या अभिनयाने जीवंत केली आहे. 'संगीत मानापमान' या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शकाच्या (Director) भूमिकेत दिसणार आहे. याआधी त्याने 'कट्यार काळजात घुसली' (Katyar Kaljat ghusali) या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. यातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. त्याचा नवा चित्रपट 'संगीत मानापमान' देखील एक संगीतमय चित्रपट असणार आहे. शंकर एहसान लॉय (Shankar Ehsaan Loy) यांनी या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे या चित्रपटातील गाणीदेखील तितकीच लोकप्रिय होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





'संगीत मानापमान' या चित्रपटाची कथा कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित नाटकाच्या कथेवरुनच प्रेरित आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी ज्योती देशपांडे यांनी सांभाळली आहे. सुबोधच्या पोस्टवर प्रेक्षकांच्या कमेंट्स पाहता या चित्रपटाबद्दल त्यांना कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.


Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने