वाशीत नंदेश उमप यांची संगीत मैफील

नवी मुंबई( प्रतिनिधी) - नवी मुंबई शहराच्या ऐरोली विभागात मागील ३५ वर्षांपासून अविरतपणे वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणार्‍या लायन्स क्लब ऑफ ऐरोली शाखेच्यावतीने ‘आरोग्य संजीवनी‘या उपक्रमा अंतर्गत आरोग्य विषयक सुविधांकरीत निधी संकलन करण्यासाठी महाराष्ट्राचा कणखर आवाज म्हणून ओळख असणारे गायक नंदेश उमप यांच्या मराठी आणि हिंदी गाण्याची संगीत मैफील आयोजित करण्यात आली आहे. येत्या शुक्रवार ५ मार्च रोजी रात्री ८ वाजता ही संगीत मैफिल नवी मुंबईकर रसिकांना अनुभवता येणार आहे.


लायन मनोज ब्रीड यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, लायन्स क्लबच्या ऐरोली शाखेने सदर संगीत मैफिल वैद्यकीय केंद्र आणि इतर सामाजिक उपक्रमांच्या मदत निधी करीता आयोजित केली आहे. आज अनेक उपचाराकरीता महागडी वैद्यकीय साधणे असल्याने त्याचा लाभ गरजू रुग्णांना घेता येत नाही त्यांना लागणारा खर्चाचा भार कमी व्हावा यासाठी नवीन वैद्यकीय उपकरणे देण्यासाठी त्याच प्रमाणे ऐरोलीत प्रथमच अद्ययावत नेत्र तपासणी केंद्र लायन्स क्लबच्या माध्यमातून सुरु करण्याकरीता यातील निधीचा वापर केला जाणार आहे.


लायन्स क्लबने गणेश दर्शन स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, चित्रकला स्पर्धा आणि गरजू रुग्णांवर माफत दरात आरोग्य सुविधा दिल्या आहे. याला ज्या प्रमाणे नागरिकांनी प्रतिसाद दिला त्यापेक्षाही अधिक नागरिकांनी गरजवंतासाठी आपला खारीचा वाटा उचलत सहभागी होण्याचे आवाहन लायन मनोज ब्रीद यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी लायन मनोज ब्रीद (९३२०२५०२७७), लायन प्रिती शेट्टी (९९६७५५२४९९), लायन संजय आवारे (९८२०००९९७९)यांच्याशी संपर्क साधावा.

Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत