Chandrashekhar Bawankule : खंडणी वसुली गँग चालवणारी, राज्याला लुटणारी उद्धव ठाकरेंची महाभ्रष्टाचारी आघाडी!

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार


मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Elections) रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष (Political Parties) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील चंद्रपूर (Chandrapur) येथील सभेत उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) पक्ष बनावट शिवसेना असल्याची घणाघाती टीका केली. त्यावर उद्धव ठाकरेंनी आज मविआच्या (MVA) एकत्र पत्रकार परिषदेत भाजप व पंतप्रधान मोदींवर टीका केली. या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाभ्रष्टाचारी आघाडीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटल्याचा पलटवार बावनकुळे यांनी केला आहे.


चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या एक्स (X) अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र उपसलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, 'महाभ्रष्टाचारी आघाडीने ज्यांच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटलं ते उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. हा एक मोठा विनोद आहे. मविआचं सरकार असताना खंडणी वसुली गँग कोण चालवत होतं? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. सचिन वाझेची नियुक्ती करून महिन्याला शंभर कोटी वसुलीची सुरूवात कोणी केली होती? याचं आधी उबाठा यांनी उत्तर द्यावं'.


पुढे त्यांनी लिहिलं आहे की, 'खरं तर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेनेमधून शिवसैनिकांनीच तडीपार केलं. ते आता नकली शिवसेना घेऊन सोनियांना शरण गेले आहेत. त्यामुळेच तुकडे गँगचा म्होरक्या असलेल्या काँग्रेसचा जाहीरनामा देखील उद्धव ठाकरेंना प्रिय वाटतोय. पण उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावं २०१४, २०१९ प्रमाणे यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकणार आहे आणि ४ जूननंतर तुम्हालाही घरात बसून राहण्याचं आवडतं काम करावं लागेल. अब की बार ४०० पार', असं जोरदार प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.




Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने