Nitesh Rane : ...तेव्हा बायकोपेक्षा जास्त तुम्ही मोदीजींचं नाव घ्यायचात!

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर घणाघात


मविआच्या काळात वरुण सरदेसाईला संरक्षण का दिलं?; राऊतांच्या टीकेवर नितेश राणे यांचं प्रत्युत्तर


मुंबई : दिल्ली येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावर लगेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बेताल टीका करण्यास सुरुवात केली. त्याचसोबत अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरासमोर आज गोळीबाराची घटना घडली. यावरुन संजय राऊतांनी सरकारच्या गृहखात्याला लक्ष्य केले. यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 'भाजपाच्या जाहीरनाम्यावर आणि मोदीजींच्या दहा वर्षांच्या प्रवासावर टीका करताय, पण त्यातील सहा वर्षे तुम्ही आमच्यासोबत होता आणि तेव्हा बायकोपेक्षा जास्त तुम्ही मोदीजींचं नाव घ्यायचात' असा घणाघात नितेश राणे यांनी केला. त्याचबरोबर मविआच्या काळातील संरक्षणाचे दाखले देत नितेश राणे यांनी राऊतांना सुनावलं आहे.


संजय राऊतांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, भाजपा आणि एनडीएने आज १४ एप्रिललाच जाहीरनामा कसा प्रकाशित केला, यावर हे महाशय भाष्य करतात. दहा वर्षे मोदीजींच्या पूर्ण प्रवासावर टीका हा संजय राऊत करतो. पण २०१४ आणि २०१९ मध्ये जो जाहीरनामा आम्ही बाहेर काढला होता त्याचा भाग तुम्हीदेखील होतात. तुम्ही स्वतःच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी मोदीजींच्या सरकारचा जाहीरनामा वाचून दाखवत होतात. दहा वर्षांवर टीका करत असताना त्यातील सहा वर्षे तुम्ही आमच्याबरोबरच होता. मग तेव्हा तुम्हाला जाहीरनामा कडू वाटला नाही? संविधान धोक्यात वाटलं नाही? तेव्हा बायकोपेक्षा जास्त तुम्ही मोदीजींचं नाव घ्यायचात. म्हणून आता तुमच्या टीकेला जनता महत्त्व देत नाही, अशी सणसणीत टीका नितेश राणे यांनी केली.



आमच्या सरकारमध्ये प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी आमची


नितेश राणे म्हणाले, अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आज फायरिंग झाली. मी परत एकदा राज्यातल्या जनतेला विश्वास देऊ इच्छितो की राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी ही आमच्या महायुती सरकारची आहे. देवेंद्र फडणवीसांच्या रुपाने राज्याला अतिशय कर्तबार असे गृहमंत्री लाभलेले आहेत. म्हणून कोणाच्याही केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास मी देतो, असं भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले. सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झाला त्यावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर नितेश राणे यांनी परखड भाष्य केले. यावेळेस त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही लक्ष्य केले.


नितेश राणे म्हणाले, संजय राऊतसारख्या लोकांना समजलं पाहिजे की हे काय मविआचं सरकार नाही. उद्धव ठाकरे इथे मुख्यमंत्री नाही. जिथे मोठमोठ्या उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटिनच्या काड्या ठेवायच्या आणि मग सचिन वाझेंसारख्या पोलीस उपायुक्तांनी या संपूर्ण षडयंत्राचा भाग व्हावं, असं इथे घडत नाही. आमच्या सरकारमध्ये प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असं नितेश राणे म्हणाले.



मविआच्या काळात वरुण सरदेसाईला संरक्षण का दिलं?


पुढे ते म्हणाले, संजय राऊत टीका करतो, की चिल्लर चिल्लर लोकांना पोलीस संरक्षण दिलं जातं, मग मविआच्या काळात वरुण सरदेसाईला संरक्षण का दिलं गेलं होतं? मातोश्रीमध्ये भाजी आणून देणार्‍या, भांडी उचलणार्‍या लोकांनाही तेव्हा संरक्षण दिलं होतं आणि महत्त्वाची लोकं म्हणजे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नारायण राणे ज्यांना खरी सुरक्षेची गरज होती त्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचं काम मविआने केलं होतं, असा आरोप नितेश राणे यांनी केला.


Comments
Add Comment

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले