PM Narendra Modi : दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते भाजपाचे 'संकल्प पत्र' प्रसिद्ध

भाजपा जाहीरनाम्याचे नाव ‘मोदी की गारंटी’


पंतप्रधान मोदी यांनी केल्या 'या' मोठ्या घोषणा


युवा, नारीशक्ती , गरीब शेतकऱ्यांवर आधारित जाहीरनामा


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २५ जानेवारी २०२४ रोजी निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर १५ लाखांहून अधिक सूचना आल्या होत्या. आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपाचा संकल्प पत्र (BJP Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहीरनाम्याचे नाव 'मोदी की गारंटी' असे नाव देण्यात आले आहे. युवा, नारीशक्ती , गरीब शेतकऱ्यांवर आधारित हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी लोकसभा निवडणूक २०२४ (Loksabha Election 2024) साठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध (BJP Manifesto) करण्यात आला. हे जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. भाजपाकडून या जाहीरनाम्याला संकल्प पत्र असे संबोधित करण्यात आले असून या जाहीरनाम्याची पहिली प्रत सरकारी योजनेच्या एका लाभार्थ्याला देण्यात आली आहे.


“आज अतिशय शुभ दिवस आहे. आज काही राज्यात नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. संपूर्ण भारताला भाजपाच्या संकल्प पत्राची प्रतिक्षा होती. भाजपाने दिलेले सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. देशातील जनतेला भाजपावर विश्वास आहे. हा जाहीरनाम्यामध्ये युवा, शेतकरी, नारी शक्ती, गरीबांवर आधारीत आहे. भारतीयांचे जीवनमान उंचवण्याकडे आमचा फोकस आहे. गरीबांच्या जेवणाची धाळी पोषणयुक्त असावी, असा आमचा संकल्प आहे. मोफत राशनची योजना पुढील पाच वर्ष सुरु राहणार आहे. ७० वर्षावरील वद्धांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे, गरीबांसाठी ३ कोटी घरे बांधण्याचा संकल्प आमचा आहे. आता घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे”,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा जाहीरनामा प्रसिद्ध करताना म्हटले.




Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी