Baramati Loksabha : बारामतीमध्ये अपक्ष उमेदवाराला दिले 'तुतारी' चिन्ह!

बालेकिल्ल्यातल्या प्रकारामुळे शरद पवार गटाची नाराजी; निवडणूक आयोगाकडे केली तक्रार


बारामती : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली आणि राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. यानंतर राष्ट्रवादीचं मूळ चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) मिळालं तर, शरद पवार गटाला (Sharad Pawar) 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह देण्यात आलं. मात्र, याच तुतारीमुळे बालेकिल्ला असलेल्या बारामतीत (Baramati Loksabha) शरद पवारांसमोर एक मोठी अडचण उभी ठाकली आहे. या ठिकाणी एका अपक्ष उमेदवाराला 'तुतारी' चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणी निवडणूक आयोगात (Election commission) धाव घेतली आहे.


बारामती म्हणजे शरद पवार आणि अजित पवारांसाठी अटीतटीचा सामना असणार आहे. या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी नणंद भावजयीची लढत पाहायला मिळणार आहे. पण निवडणुकीपूर्वीच शरद पवारांसमोर एक मोठं संकट आलं आहे. सुप्रिया सुळे या 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याने जर 'तुतारी' हेच चिन्ह अपक्ष उमेदवाराला मिळालं तर मतदारांचा गोंधळ उडू शकतो आणि मतं फिरु शकतात. त्यामुळे शरद पवार गटाने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.



कसे झाले चिन्हवाटप?


बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीतील निवडणुकीसाठी एकूण ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची २० एप्रिलला पडताळणी झाली. त्यामध्ये पाच अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. तर ४६ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून ३८ उमेदवार रिंगणामध्ये राहिले आहेत. या ३८ उमेदवारांना काल चिन्हांचे वाटप करण्यात आले.


दरम्यान, बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सोयल शहा युनूस शहा शेख यांनी चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमामध्ये 'तुतारी' या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे.



हा निर्णय माझ्या हातात नाही : जिल्हा निवडणूक अधिकारी


दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राला वाटप केलेली चिन्हे आहेत. या चिन्हांबाबत काही आक्षेप असल्यास त्यावर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मला निर्णय घेता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगच याबाबतचा निर्णय घेईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. सुहास दिवसे यांनी सागितले.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा