Buldhana Bus Accident : बुलढाण्यात भीषण अपघात; १०० फूट खोल दरीत कोसळली बस!

२८ प्रवासी जखमी


बुलढाणा : देशभरात अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना अशातच बुलढाण्यामधून भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवासी बस दरीत कोसळून भयंकर घटना घडली. या अपघातात बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व प्रवासींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, इंदोर येथील रॉयल ट्रॅव्हल्सच्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. बुलढाण्यामधील जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात खासगी बस १०० फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. सकाळी बस इंदोर येथून अकोलाकडे जात असताना सुमारे साडे पाच वाजता हा अपघात झाला.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली. बसमधील २८ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर दर्यापूर (मध्यप्रदेश ) व बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

Swine Flu : पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा वाढता धोका; ऑगस्टमध्ये 31 रुग्ण, पालिकेचा सावधगिरीचा इशारा

पिंपरी-चिंचवड : ऐन सणासुदीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. शहरात स्वाईन

Virar crime news : सवतीचा राग अनावर! नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोवर चाकू अन् त्रिशूळने प्राणघातक हल्ला; विरारमधील धक्कादायक घटना

विरार : पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच संतापाच्या भरात एका महिलेने तिच्या सवतीवर चाकू आणि त्रिशूळने

Dhule : मनमाड–इंदूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, संयुक्त मोजणीचे पथक माघारी

Dhule : मनमाड–इंदूर रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या संयुक्त मोजणीला अवधान परिसरातील शेतकऱ्यांनी

Ramabai Ranvir : लेकींच्या शिक्षणासाठी ४७ वर्षीय आईची अनोखी जिद्द; चप्पल तुटली, अनवाणी धावली अन् ३ किमीची शर्यत जिंकली!

पुणे : मुलांच्या भविष्यासाठी आई कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यास तयार असते, याचं प्रेरणादायी उदाहरण पुण्यात

Jalgaon : चाळीसगावमध्ये भीषण अपघात ! भरधाव कारने तीन महिलांना उडवले, एकीचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर बिलाखेड

Sangli crime news : तोंडातून पांढरा फेस अन् उग्र वास; कौटुंबिक वादातून पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; सांगलीत खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादाच्या कारणावरून एका