Megha Dhade : राहुल गांधी माझा देश सोडा आणि नरकात जा!

मराठी अभिनेत्री मेघा धाडेने व्यक्त केला तीव्र संताप


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आजवर अनेक कलाकारांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला आहे. नुकतेच अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) हिने भाजपाला साथ दिली तर काही महिन्यांपूर्वीच 'बिग बॉस' फेम मराठी अभिनेत्री मेघा धाडेनेही (Megha Dhade) भाजपामध्ये प्रवेश केला. मेघा धाडे सोशल मीडियावर सक्रिय असते आणि राजकारणाविषयी अनेकदा आपलं मतही मांडत असते. यातच तिने आपल्या इन्स्टा स्टोरीवर काँग्रेस नेते राहुल गांधींचा (Rahul Gandhi) एक व्हिडीओ शेअर करत त्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 'राहुल गांधी माझा देश सोडा आणि नरकात जा', असं ती म्हणाली आहे.


मेघा धाडे हिने राहुल गांधी यांचा एक रील व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने राहुल गांधी यांना टॅग करत तिचा राग व्यक्त केला आहे. भाजपचे नेते राजेश पांडे यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. जो मेघाने तिच्या स्टोरीला पोस्ट केला आहे. यामध्ये राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा वारंवार बाजूला सारण्याचा प्रयत्न करतायत.


राजेश पांडे यांनी ज्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साठी आदर नाही त्यांच्या साठी पुणेकरांच्या मनात जागा नाही, काँग्रेस च्या राहुल गांधी चा धिक्कार असो, आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर राहुल गांधी ने पुण्याच्या सभेत केला, असा आरोपही त्यांच्यावर केला आहे. हिच पोस्ट मेघाने शेअर करत राहुल गांधी यांच्यावर संताप व्यक्त केला.


मेघा धाडेने हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं की, जे राहुल गांधी यांना सपोर्ट करतात, त्यांची लाज वाटते. राहुल गांधी मी तुमचा तिरस्कार करते. माझा देश सोडा आणि नरकात जा. सध्या मेघाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी