श्रीरामांचे दर्शन, २ किमीचा रोड शो, रविवारी अयोध्येला जाणार पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या (loksabha election 2024) तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मेला होत आहे. याआधी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत जातील. अयोध्येत ते आधी श्रीरामांचे दर्शन घेतील. त्यानंतर रोड शो करतील. याआधी त्यांनी महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या लोकार्पणादरम्यान अयोध्येत रोड शो केला होता. लोकसभा निवडणूक २०२४च्या दरम्यान पंतप्रधान पहिल्यांदा अयोध्येत जात आहेत.


पंतप्रधान मोदी सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचारसभा घेत आहेत. ते दररोज देशाच्या विविध भागांमध्ये जाऊन रोड शो तसेच सभा घेत आहेत. यातच रविवारी ५ मेला ते अयोध्येला पोहोचत आहेत. खरंतर ते अयोध्येला निवडणुकीच्या प्रचाराला जात आहेत मात्र आपल्या कार्यक्रमाआधी ते राम मंदिरात भगवान रामांचे दर्शन घेतील.



भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांच्या समर्थनार्थ करणार रोड शो


अयोध्या पोहोचल्यावर पंतप्रधान मोदी राम मंदिरात पुजा-अर्चा करतील. तेथून फैजाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार लल्लू सिंह यांच्या समर्थनार्थ रोड शो करतील. पंतप्रधान मोदी रविवारी दुपारी ३ वाजता इटावा येथे पोहोचतील. तेथे सार्वजनिक सभा घेतील. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमाासा पीएम धौरहरा लोकसभा मतदारसंघासाठी रवाना होतील. तेथे एक सार्वजनिक सभा घेतील.


यानंतर पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचतील आणि संध्याकाळी ७ वाजता राम मंदिरात भगवान रामांचे दर्शन घेतील. अयोध्येत पंतप्रधान मोदी साधारण २ किमीचा लांब रोड शो करतील. अयोध्येत पाचव्या टप्प्यासाठी २० मेला मतदान होत आहे.

Comments
Add Comment

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम