HSC Exam Result : बारावी फेल झालात? लोड घेऊ नका! 'हे' आहेत तुमच्या यशाचे पर्याय

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यावर्षी बारावीचा राज्याचा निकाल (HSC Result) ९३.३० टक्के लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात ९ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी पास झाले. मात्र इतर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.


अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे म्हटले जाते. अपयश हे प्रत्येकाला कुठेतरी आले आहे. कोणाला नापास होऊन तर कोणाला कमी गुणांनी. पण नापास झालात तर हताश होऊ नका. बारावी नापास झाल्यावर अनेक कोर्स उपलब्ध आहेत जे तुम्हाला यशस्वी करु शकतात. तसेच या कोर्समध्ये प्रवेश घेऊन तुमचे चांगले करियरही घडू शकते.



'हे' कोर्स करा-



  • आयटीआय डिप्लोमा कोर्सेस - तुम्ही जर १२ वी मध्ये नापास झाला असला तर तांत्रिक क्षेत्रात करियर बनवता येईल. त्यासाठी आयटीआय डिप्लोमा कोर्स करणे तुम्हीच्यासाठी उत्तम पर्याय आहे. भारत सरकारने प्रत्येक शहरात आणि गावात आयटीआय केंद्रे उघडली आहेत. तुम्ही ६ वर्षांचा किंवा २ वर्षांचा डिप्लोमा कोर्स करू शकता. त्यात तुम्हाला सरकारी क्षेत्रात बर्‍याच रोजगाराच्या संधी मिळू शकतात.

  • कॉम्पुटर डिप्लोमा कोर्सेस - डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा नसेल तर आपण कॉम्पुटर डिप्लोमा कोर्स करू शकता. ज्यामध्ये तुम्ही कॉम्पुटर, हार्डवेअर, नेटवर्किंग, मोबाईल, एचटीएमएल, व्हिडीओ एडिटिंग, ड्रीमव्ह्यूव्हर आणि कॉम्प्यूटर या अँप्लिकेशन विषयांचा अभ्यास शिकू शकता.

  • अ‍ॅनिमेशन मधील डिप्लोमा कोर्सेस - अ‍ॅनिमेशनच्या सतत वाढत्या वापरामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठी मागणी आहे. अ‍ॅनिमेशन कोर्स करिअरची हमी म्हणून पाहिला जात आहे. चित्रपट, खेळ आणि जाहिराती यासारख्या क्षेत्रात अ‍ॅनिमेशनचा बराच वापर केला जातो. अ‍ॅनिमेशनच्या अनेक डिप्लोमा कोर्समध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण प्रवेश घेऊ शकता.

  • डिझाइन मधील डिप्लोमा कोर्सेस - दहावी उत्तीर्ण झाल्यावरच तुम्ही डिझाईनच्या कोणत्याही पदवीच्या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता. जर तुम्हाला डिझाईन क्षेत्रात रस असेल तर! डिझाईनमध्ये तुम्ही ग्राफिक डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग इत्यादी क्षेत्रात डिप्लोमा कोर्स करू शकता.

  • इंजीनियरिंग डिप्लोमा कोर्सेस - दहावी उत्तीर्ण मार्कशीटच्या आधारे आपण इंजीनियरिंगच्या डिप्लोमा कोर्स करू शकतो. दहावी पासून इंजीनियरिंगच्या तीन वर्षाच्या डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता. या डिप्लोमा कोर्समुळे तुम्हाला खासगी कंपनी मध्ये चांगली नोकरी मिळू शकते. मॅकेनिकल इंजीनियरिंग , इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, सिव्हिल इंजीनियरिंग, संगणक इंजीनियरिंग, माहिती तंत्रज्ञान इंजीनियरिंग, केमिकल इंजीनियरिंग इत्यादी इंजीनियरिंगच्या क्षेत्रात प्रवेश करू शकता.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा