Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना धक्का! अंतरिम जामीन अर्ज फेटाळत तुरुंगवासातही वाढ

नवी दिल्ली : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लँड्रिंगचा आरोप आहे. त्या प्रकरणी ते दीड महिना तुरुंगात होते. यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी त्यांचा २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. हा अंतरिम जामीन (Interim Bail) संपल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केले. मात्र, त्यानंतर त्यांनी अंतरिम जामीन मिळण्यासाठी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळत केजरीवालांच्या तुरुंगवासात आणखी वाढ केली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवालांसाठी हा मोठा धक्का आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. राऊज ॲव्हेन्यूच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ केली आहे. तसेच वैद्यकीय कारणास्तव ७ दिवसांच्या जामीनासाठी अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेली अंतरिम जामिनाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. असे असले तरी न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत.


ईडीकडून अंतरिम जामिनास जोरदार विरोध


यापूर्वी झालेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी ईडीकडून या अंतरिम जामिनाला जोरदार विरोध करण्यात आला होता. याचिका सुनावणीयोग्य नसल्याचा युक्तिवाद ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी केला होता. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी २१ दिवसांच्या अंतरिम जामिनाच्या काळात वैद्यकीय चाचण्यांऐवजी प्रचारसभांना संबोधित केले असून ते आजारी नाहीत हे स्पष्ट दिसून येत होते. तसेच त्यांचे वजन सात किलोंनी घटले नसून एक किलोने वाढल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा केजरीवालांना दिलासा मिळाला नाही.

Comments
Add Comment

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

Himachal Pradesh: बर्फवृष्टीमुळे हिमाचलमध्ये निसर्गाचं नयनरम्य दृश्य, धरतीवरील नंदनवनात हिवाळ्याची चाहूल!

शिमला शिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. शिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी