Ajit Pawar group : अजित पवारांच्या पदरी घोर निराशा! दिल्लीवारीनंतरही राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रीपद नाही

नवी दिल्ली : देशात एनडीए (NDA) तिसर्‍यांदा सत्तास्थापन करणार असून आज संध्याकाळी सव्वासात वाजता नव्या मंत्रिमंडळाचा (Cabinet) शपथविधी सोहळा (Oath taking ceremony) पार पडणार आहे. केंद्रीय मंत्रिपदासाठी (Union Ministers) कोणाकोणाची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. आता दिल्लीतून महायुतीच्या (Mahayuti) कोणत्या खासदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे, याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar's NCP) संधी मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजित पवारांच्या पदरी घोर निराशा आली आहे.


राज्यात अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर राज्यसभेत प्रफुल पटेल हे खासदार आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणा एकाला मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. मात्र, प्रफुल पटेल यांना अजूनही कोणताही फोन गेलेला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकल्यानंतरही मंत्रिपदाबाबत फोन आलेला नसल्याने अजित पवार गट मंत्री पदासाठी अजूनही वेटिंगवर असल्याचे चित्र आहे.


आज शपथ घेणार्‍या नव्या मंत्र्यांना नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी चहापानासाठी बोलावले आहे. मात्र, यात अजित पवार गटाच्या कोणालाच अद्याप फोन आलेला नाही. यासंबंधी सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक पार पडत आहे. या बैठकीला अजित पवार, प्रफुल पटेल व सुनील तटकरे उपस्थित असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments
Add Comment

रशियन तेल खरेदीवर भारताला टॅरिफमधून सूट, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, भारतासह 'या' पाच देशांना दिलासा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या भारतासह पाच देशांना

School Bus Fire : उन्नावमध्ये शालेय बसला भीषण आग! 60 विद्यार्थी थोडक्यात बचावले; महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे लखनौ-कानपूर महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन

संपत्तीच्या वादात माणुसकी हरवली ! 3 दिवस घरातच पडून राहिला वृद्धाचा मृतदेह, अखेर...

पैसा, संपत्ती आणि मालमत्तेच्या हव्यासापोटी माणुसकी हरवत चालल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. तेलंगणातील एका

Andhra Pradesh Temple : नवरात्रीत देवीची अनोखी सजावट! तब्बल 4.42 कोटींच्या नोटांनी मंदिर सजवलं; पाहून व्हाल थक्क!

आंध्र प्रदेशातील अमलापूरम येथील श्री वासवी कन्यका परमेश्वरी अम्मावरू मंदिर सध्या आपल्या अनोख्या सजावटीमुळे

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; छातीत संसर्ग, प्रकृती स्थिर

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्याने दिल्लीतील अपोलो

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या