Paytm Layoff : आर्थिक मंदीचा दणका! 'या' कंपनीकडून ३५०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

मुंबई : देशभरात वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसत आहे. मात्र या महागाईचा मार सर्वसामान्य नागरिकांशिवाय इतर मोठ्या कंपन्यांनाही बसला आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे जगभरातील कंपन्यांनी संकटाची चाहूल लागताच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातच कॉर्पोरेट (Corporate) व आयटी (IT) क्षेत्रासह आता आणखी एका नावाजलेल्या कंपनीला आर्थिक मंदीचा दणका बसला आहे. त्यामुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच 'या' मोठ्या कंपनीने देखील ३००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा बाहेरचा रस्ता दाखवला आहे.



'या' कंपनीला बसला आर्थिक दणका


वन९७ कम्युनिकेशन्स अर्थात 'पेटीएम'चे (Paytm) स्वामित्व हक्क असणाऱ्या कंपनीकडून ३५०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याची माहिती मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. त्यासोबत या कंपनीने, काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांची आउटप्लेसमेंट अर्थात दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठीचा शोध घेण्यासंदर्भात काळजी घेत असल्याचा दावाही केला आहे.


दरम्यान, कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी नोकरी मिळवून देण्याच्या हेतूने सध्या कंपनीच्या HR विभागाकडून जवळपास ३० हून अधिक संस्थांशी संपर्क साधला जात आहे. त्यामुळे येत्या काळात नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या संस्थांमध्ये नोकरीवर रुजू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांची बोनसची रक्कम आणि तत्सम देय रक्कम बाकी आहे, अशा कर्मचाऱ्यांना पूर्ण परतावा देण्यावर आपला भर असल्याचे पेटीएमकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



पेटीएमने स्पष्ट केले कारण


जानेवारी ते मार्च २०२४ या महिन्यांमध्ये पेटीएममधील कर्मचाऱ्यांची संख्या ३५०० ने कमी होऊन आता ३६,५२१ वर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) पेटीएम पेमेंट्स, बँकिंग सेवांवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ही कर्मचारी कपात करण्यात आल्याचे म्हटले आहे. १५ मार्चपासूनच आरबीआयने कोणत्याही ग्राहक, वॉलेट, फास्टॅग मध्ये जमा रकमेचा स्वीकार करण्यावर बंदी आणली होती. त्यामुळे पेटीएमचे नुकसान चौथ्या तिमाहीत वाढून ५५० कोटींवर आले होते. येत्या काळात या अडचणी कमी होणार नसल्याचे चित्र दिसल्यामुळे कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि