केंद्रिय मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर भाजपाचाच प्रभाव

मोदींच्या विश्वसनीय टीमकडेच सोपविली महत्त्वाची मंत्रालये


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कॅबिनेटमध्ये यंदा ७१ मंत्र्यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रीय हित आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या सुरक्षा मंत्रिमंडलीय समितीशी निगडित सर्व खाती भाजपाने स्वत:कडे ठेवली आहेत. इतकेच नाही तर नरेंद्र मोदी यांनी पुन्हा त्यांच्या विश्वसनीय टीमकडेच ही मंत्रालये सोपवली आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात मोठे निर्णय घेतले जातील, असे सांगत आहेत. मागील १० वर्षे फक्त ट्रेलर होता असे ते म्हणतात. नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मंत्र्यांना खातेवाटप केले आहे. त्यात संरक्षण, गृह, परराष्ट्र आणि अर्थ यासारखी हायप्रोफाईल खाती भाजपाकडेच ठेवली आहेत. त्यासोबतच आरोग्य, परिवहन, शिक्षण, ऊर्जा, शहरी विकास, कृषी, वाणिज्य उद्योग, दूरसंचार, पर्यावरण, पर्यटन, महिला व बालविकास, रोजगार, जलशक्ती मंत्रालय हेदेखील भाजपाकडे आहे.



सहकारी पक्षांच्या मदतीने तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात यश



  • भाजपा यंदा स्वबळावर बहुमत आणू शकली नाही; परंतु एनडीच्या सहकारी पक्षांच्या मदतीने तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात यश मिळाले आहे. देशात सर्वांसाठी समान कायदा बनवणे हे भाजपाच्या अजेंड्यावर आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यातही हे आश्वासन आहे. भाजपाने उत्तराखंडमध्ये याचा प्रयोग केला आहे. आता एनडीच्या तिसऱ्या कार्यकाळात यूसीसी लागू करण्यावर भाजपाचा भर असेल. यूसीसीच्या मुद्द्यांवर सहकारी मित्रपक्षांना एकत्र करणे गरजेचे आहे. भाजपाने देशात वन नेशन, वन इलेक्शनचे आश्वासन दिले आहे.


अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत एनडीए सरकारमध्ये ही खाती घटक पक्षांना दिली होती. २०१४ ते २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएच्या सरकारमध्ये चारही मंत्रालये भाजपाकडे होती. कारण पक्षाकडे बहुमत होते.

यंदाच्या निकालात भाजपाची परिस्थिती पाहता या ४ पैकी एखाद दुसरे खाते तेलुगू देसम पार्टी अथवा जनता दल युनायटेडला मिळेल असे बोलले जात होते.
Comments
Add Comment

BRICS Summit 2026 : ब्रिक्स परिषदेसाठी गुटेरेस भारतात येणार; पुतिन, पेजेशकियन आणि जिनपिंगही येण्याची शक्यता

नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो

malaria preventive medicine : मलेरिया प्रतिबंधात्मक औषध घेतल्याने 53 विद्यार्थी रुग्णालयात, 7 वर्षीय बालिकेचा मृत्यू

भद्राचलम : आंध्र प्रदेशातील पोलावरम जिल्ह्यातील गोल्लागुप्पा गावात मलेरियावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून

Ram Mandir Trust : निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिर ट्रस्टचे पहिले सीईओ नियुक्त

प्रशासकीय कामकाज अधिक मजबूत आणि सुव्यवस्थित करण्यासाठी, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने निवृत्त एअर

Kedarnath helicopter booking 2026 : केदारनाथ हेलिकॉप्टर सेवेसाठी ७ सप्टेंबरपासून बुकिंग विंडो उघडणार

डेहराडून : चारधाम यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात केदारनाथ धामला जाणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा १५

John Ternus Apple CEO : ‘ॲपल’मध्ये नव्या युगाची सुरुवात! नवीन CEO जॉन टर्नस आणि टिम कूक यांच्या पगाराचा आकडा जाहीर

दिग्गज तंत्रज्ञान कंपनी ‘ॲपल’ने (Apple) आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर मोठा बदल केला असून टिम कूक (Cook)

Haryana News : यमुनेच्या पात्रात आर्मीची बोट उलटली अन् स्पेशल फोर्सेसचे दोन जवान बेपत्ता!

हरियाणा : हरियाणातील यमुनानगर (Hariyana Yamunanagar) जिल्ह्यातील हथणीकुंड बॅरेजवर (Hathnikund News) मंगळवारी रात्री एक अत्यंत दुर्दैवी