Phd Exam : विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता! आता घरबसल्या देता येणार 'पेट' परीक्षा

'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार


सोलापूर : विद्यापीठ प्रशासनाने पीएच.डी. पूर्व 'पेट' परीक्षा (Phd Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची माहिती दिली आहे. सोलापूर (Solapur) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने (Punyashlok Ahilyadevi Holkar University) यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने पेट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशासह परदेशातील कोणत्याही विद्यार्थ्याला आता घरबसल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची 'पेट' देता येणार आहे. (Online Exam)



१३ जूनपासून अर्ज करण्याची सुरुवात


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यावेळी 'पीएच.डी.' च्या जवळपास ४७४ जागा असणार आहेत. 'पीएच.डी' पूर्वीची पेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून ६ जुलैपर्यंत अर्ज करण्याची लिंक खुली असणार आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येतील.


विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, पेट परीक्षेत दोन पेपर असतात. त्यामध्ये सकाळी रिसर्चचा पेपर तर दुसरा संबंधित विषयाचा पेपर दुपारच्या सत्रात होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या अ‍ॅन्ड्राईड मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवरूनही देता येणार आहे. मात्र कॅमेऱ्यासमोरून दोनदा विद्यार्थी हलला किंवा बाजूला झाला तर तो बाद ठरविला जाणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. हा पेपर सोडविण्याची प्रत्येकी एक तासाचा वेळ असणार आहे. तर १८ ते २० जुलै दरम्यान विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेण्यात येणार असल्याचे, विद्यापीठाने सांगितले आहे.


दरम्यान, एका विषयातून पेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २१ जुलैला परीक्षा देता येणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक विषयातून पेट द्यायची आहे, त्यांची परीक्षा २२ जुलैला होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि