Nashik news : धक्कादायक! खेळताना दोन वर्षांचा चिमुकला दुसऱ्या माळ्यावरील बाल्कनीतून पडला

काळजाचा ठोका चुकवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद


नाशिक : नाशिकच्या (Nashik news) सिडको परिसरातून एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. दोन वर्षांचा चिमुकला खेळता खेळता दुसऱ्या माळ्यावरील बाल्कनीतून पडला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने चिमुकल्याचा जीव वाचला असला तरी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सिडको परिसरातील काळे मळा परिसरात ही घटना घडली. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करिम शेख (वय २ वर्ष) असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


करिम हा सकाळी ९ वाजेच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होता. त्यावेळी करिमची आई घरकामात होती. दरम्यान, गॅलरीत खेळत असलेला करिम खेळता खेळता अचानक रेलिंगवर पकडून उभा राहिला. त्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो दुसऱ्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळला. काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे नागरिक धावत आले. करिम जखमी अवस्थेत पडल्याचे दिसताच नागरिकांनी ताबडतोब त्याला उचलून हॉस्पिटल गाठले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अंबड पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.


Comments
Add Comment

Krishna Janmashtami 2026 : कृष्णजन्माष्टमीच्या पूजेची ही वेळ अजिबात चुकवू नका! जाणून घ्या पूजेचा 'शुभ मुहूर्त'

धार्मिक मान्यतेनुसार श्रावण पक्षात येणारी अष्टमी तिथी अत्यंत पवित्र मानली जाते, कारण याच

Gokulashtami Naivedya Recipes : गोकुळाष्टमीला हे नैवेद्याचे पदार्थ नक्की बनवून बघा; श्रीकृष्णाला आवडतील असे खास पदार्थ

मुंबई : गोकुळाष्टमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये पूजा,

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

Bad Breath Remedies :तोंडाची दुर्गंधी कायमची पळवून लावा! करा हे अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य