Dharmaveer 2 : ज्याच्या घरातील स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की!

मराठीसह हिंदीत 'धर्मवीर २'चा धगधगता टीझर आऊट


मुंबई : कट्टर हिंदुत्ववादी आणि शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर २' चित्रपटाची (Dharmaveer 2) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. धर्मवीरच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती, अनेकांना हा सिनेमा आवडला. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असून त्याचा धगधगता टीझर समोर (Teaser out) आला आहे. नुकताच 'धर्मवीर २'चा पोस्टर लॉन्च सोहळा पार पडला होता. परंतु त्या आधीपासूनच या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या ९ ऑगस्टला ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधत हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येणार आहे.


चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवल्यानुसार, आनंद दिघे यांच्याकडे एक मुस्लीम महिला नगमा रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला येते. तेव्हा तिला चेहरा दाखवण्यास सांगितलं जातं. संबंधित महिलेने बुरखा बाजूला करून चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं आनंद दिघे यांना समजतं. यावर ते संतापतात. बहिणीचं रक्षण करण्यासाठी राज्यभरातून आलेल्या सगळ्या स्त्रियांना घेऊन आनंद दिघे त्या महिलेच्या घरी जातात. यावेळी “ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की…” असं सांगत ते संबंधित महिलेला मारहाण करणाऱ्याला चांगलाच धडा शिकवतात. असा अंगावर काटा आणणारा प्रसंग टीझरमध्ये पाहायला मिळतो.


'धर्मवीर २'चा टीझर मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरवर नेटकऱ्यांसह दिग्दर्शक रवी जाधव, स्वप्नील जोशी, सुबोध भावे, श्रुती मराठे या कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.


‘धर्मवीर २’या सिनेमाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी सांभाळली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची, तर क्षितीश दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. नुकताच या सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा पार पडला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.



Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा