मुंबई मेट्रोला ४,६५७ कोटी निधी मिळणार!

मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग ३ साठी केंद्र सरकारद्वारे जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्या सोबत अर्थ सहाय्याकरिता कर्जाच्या पाचव्या व अंतिम टप्प्याच्या वितरणासाठी करार करण्यात आला. यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला ४ हजार ६५७ कोटी इतका निधी मिळणार असून, प्रकल्प पूर्णत्वाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.


केंद्र सरकारच्या वतीने आर्थिक कार्य विभागाच्या अतिरिक्त सचिव मनीषा सिन्हा आणि जपान सरकारच्या वतीने जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी करारावर सह्या केल्या. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दिलेल्या केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार मुंबई मेट्रो मार्ग-३ चा सुधारित प्रकल्प खर्च ३७,२७६ कोटी इतका आहे. यापैकी जायकाचे कर्ज ५७.०९ टक्के म्हणजे २१,२८० कोटी इतके आहे.


जायका कर्ज कराराच्या पाचव्या टप्प्याची रक्कम ४६५७ कोटी असून, २०१४ पासून सुरू झालेले निधी वितरण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यासाठी १७ सप्टेंबर २०१३ रोजी स्वाक्षरी करण्यात आली होती.


मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या सुरुवातीपासून जायकाचे अमूल्य सहकार्य मिळाले आहे, शेवटच्या कर्ज टप्प्याच्या वितरणानंतर प्रकल्पाच्या उर्वरित कामांना नक्कीच गती प्राप्त होईल, असे एमएमआरसीचे नियोजन आणि रिअल-इस्टेट विकास/एनएफबीआर यांचे संचालक आर. रमणा यांनी सांगितले.

Comments
Add Comment

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून