Nitesh Rane : दिशा आणि सुशांतचा खुनी आदित्य ठाकरे हा मिहिर शाहचा डुप्लिकेट!

नितेश राणे यांचा घणाघात


उद्धव ठाकरे स्पाईनलेस : नितेश राणे


मुंबई : 'महाराष्ट्राचे गृहमंत्री हे युजलेस आहेत, असा उल्लेख संजय राजाराम राऊतने केला. त्याला स्वतःचा मालक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हा स्पाईनलेस आहे, हे त्याला अजूनपर्यंत दिसलं नाही. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर अजूनपर्यंत यांची थेट भूमिका काय आहे, ते मांडण्याची यांची हिंमत नाही आणि दुसऱ्यांना यूजलेस म्हणण्याअगोदर तुझा मालक उद्धव ठाकरे किती मोठा स्पाईनलेस आहे, याचा आधी तू अंदाज घे', असा घणाघात नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. आजच्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबिय व संजय राऊत (Sanjay Raut) यांचा चांगलाच समाचार घेतला.


नितेश राणे म्हणाले, मिहिर शाहच्या केसमध्ये जेवढी तत्परतेने आमच्या सरकारने कारवाई केली, तेवढी तत्परता तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारने कधीच दाखवली नसती. जर तेवढ्याच प्रामाणिकपणे दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यावर कारवाई झाली असती तर आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) जेलमध्ये असता, मिहिर शाहचं दुसरं रुप हे आदित्य ठाकरे आहे, तीच प्रवृत्ती आहे. त्यावेळेसही हे दोन्ही खून यांनी लपवले आणि म्हणून हा पेंग्विन बाहेर वळवळ करतोय.


पुढे नितेश राणे म्हणाले, मोठा वरळीमध्ये जाऊन खुनाचा गुन्हा दाखल करा, असं बोलण्याची हिंमत करतोय आणि स्वतःचे हात दिशा सालियनच्या आणि सुशांत सिंगच्या खुनात बरबटलेले आहेत, ते याला दिसत नाही. तेव्हा सगळे साक्षीदार, पुरावे, सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले. केस पूर्णपणे दाबली, कमिशनरवर दबाव टाकला. हे सगळं वडील मुख्यमंत्री होते म्हणून शक्य झालं. आणि आता मिहिर शाहला कलम ३०२ खाली अटक करा, असं म्हणतो. पण या मिहिर शाहचा असली बाप, डुप्लिकेट हा आदित्य ठाकरे आहे. त्यामुळे जो नियम मिहिर शाहला लागतो, तोच या आदित्य ठाकरेला पण लागतो, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु