मुंबईत 'टीस'चा विद्यार्थी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

मुंबई : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये (TISS) शिक्षण घेणारा विद्यार्थी त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला. अनुराग जयस्वाल असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत अनुराग जयस्वाल हा टीसच्या मानव संसाधन कार्यक्रम म्हणजेच ह्यूमन रिसोर्सचा भाग होता. तो मूळचा लखनऊचा होता.


अनुराग जयस्वाल शनिवारी रात्री वाशी येथे आपल्या मित्रांसह एका पार्टीत गेला होता. येथे तो आणि त्याचे मित्र मद्यधुंद होते, अशी माहिती समोर आली आहे. रात्री झोपलेला अनुराग हा सकाळी जागा झालाच नाही. त्याला सकाळी जाग न आल्याने मित्रांनी चेंबूर येथील स्थानिक रुग्णालयात नेले. तेथे पोहोचल्यावर अनुरागला मृत घोषित करण्यात आले.


अनुरागच्या सर्व मित्रांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यासोबत रॅगिंग झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.


दरम्यान टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने अनुरागच्या मृत्यू संदर्भात ट्वीट केले आहे. एका पोस्टमध्ये संस्थेने विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. आमचे विचार आणि प्रार्थना अनुरागच्या कुटुंबीयांसोबत नेहमी असेल. 'आम्ही TISS मुंबईच्या HRM आणि LR चे प्रथम वर्षाचे विद्यार्थी, अत्यंत दुःखाने आणि जड अंतःकरणाने अनुराग जयस्वाल यांचे निधन झाल्याची घोषणा करत आहोत. या हृदयद्रावक प्रसंगी आम्ही अनुरागच्या कुटुंबासोबत आहोत. आमचे विचार आणि प्रार्थना नेहमीच अनुरागच्या कुटुंबासोबत असतील,' असेही त्यात म्हटले आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने