Kolkata News : कोलकात्याच्या एसएन बॅनर्जी रोडवर स्फोट; एक जण जखमी!

कोलकाता : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील तलतल्ला परिसरात आज, शनिवारी दुपारी एसएन बॅनर्जी रोडवर रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या स्टीलच्या टिफिनचा अचानक स्फोट होऊन एक जण गंभीर जखमी झाला. बापी दास असे जखमीचे नाव असून त्याच्या हाताला स्फोटात गंभीर इजा झाली आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले. शिवाय, घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ञही तैनात करण्यात आले आहेत, जे स्फोट कसा आणि कोणत्या परिस्थितीत झाला हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हा परिसर तातडीने सील करण्यात आला असून संपूर्ण परिसरात सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे. या अपघातामागे काही संघटित कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा प्रत्येक कोनातून वस्तुस्थिती तपासत आहेत.

या स्फोटामुळे स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी हादरले आहेत. सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असून या घटनेनंतर संपूर्ण परिसरात अतिरिक्त दक्षता घेण्यात येत आहे. जखमी बापी दास यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. स्फोटाची कारणे लवकरात लवकर शोधून दोषींवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. सुरक्षा एजन्सी घटनास्थळाच्या आसपास सर्व संभाव्य पुरावे गोळा करत असून या मार्गावरून नागरिकांची ये-जा बंद करण्यात आलीय.

Comments
Add Comment

आईच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यना भावूक, शेअर केले भावनिक पत्र

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे दोन

Asia Power Index 2026 : आशियातील महासत्तांच्या यादीत भारताची मोठी झेप ! जपान आणि रशियाला टाकले मागे

Asia Power Index 2026 : आशियातील सर्वात शक्तिशाली देश कोणता? या प्रश्नाचे उत्तर देणारा २०२६ चा 'एशिया पॉवर इंडेक्स' जाहीर झाला

बिसलेरीचं पाणी अशुद्ध, बाटलीबंद पाण्यात कर्करोगकारक घटक; FSSAI ची धडक कारवाई

मुंबई: व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पाण्याचे एक वेगळेच स्थान आहे. शुद्ध आणि चांगल्या दर्जाचे पाणी पिण्यासाठी आपण

पश्चिम बंगालच्या भाजपा महिला आमदाराची प्रकृती खालावली, व्हेंटिलेटरवर उपचार सुरू; नेमकं काय घडलं?

कोलकाता: पश्चिम बंगालमधील भाजपाच्या महिला आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर एका खासगी

Hyderabad News : हैदराबादमध्ये 2 बॉम्बस्फोटांची धमकी; 300 जणांना ठार मारण्याचा इशारा, पोलीस सतर्क

Hyderabad News: लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेच्या नावाने कथितरित्या देण्यात आलेल्या धमकीनंतर हैदराबाद पोलिसांना

Delhi News : 55 लाखांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग हरवली; दिल्ली पोलिसांनी सहा दिवसांत शोधून मालकाला केली परत

दिल्ली : दिल्लीतील काश्मिरी गेट आंतरराज्य बस स्थानकावर (ISBT) हरवलेली सुमारे 55 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या